आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून कळवण नगरपंचायतला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत निधी मिळाला असून, त्याअंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार होते.
प्रमुख अतिथी म्हणून कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, माजी सरपंच सुनील जैन, नगरसेवक जयेश पगार, अतुल पगार, बाळासाहेब जाधव, समता परिषद तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल, युवा नेते भूषण पगार, राजेंद्र पगार, हरिचंद्र पगार, गौरव पगार राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जितेंद्र पगार आदी उपस्थित होते. आमदार नितीन पवार यांनी उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून कळवण शहरातील १७ प्रभागात ५५ कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली असून, नागरिकांच्या मागणीनुसार सिमेंट काँक्रिटीकरण, डांबरीकरण रस्ते विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यावेळी प्रगतिशील शेतकरी सुभाष राजाराम पगार, दिनकर पगार, देवराम पगार, रिंकू पगार, डॉ. सम्राट पवार, प्रतीक देवरे, बापूसाहेब खैरनार, जयराम पगार आदी उपस्थित होते.
फोटो - ०७ कळवण नितीन पवार
कळवण शहरातील गणेशनगर भागातील वाहतूक पुलाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार नितीन पवार, देवीदास पवार कौतिक पगार, धनंजय पवार, राजेंद्र भामरे, शशी बागुल आदी.
===Photopath===
070621\07nsk_56_07062021_13.jpg
===Caption===
फोटो - ०७ कळवण नितीन पवार कळवण शहरातील गणेशनगर भागातील वाहतूक पुलाच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार नितीन पवार, देविदास पवार कौतिक पगार, धनंजय पवार, राजेंद्र भामरे, शशी बागुल आदी.