मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने ५० वर्षांची यशस्वी वाटचाल करून अनेक उच्चपदस्थ विद्यार्थ्यांना घडविले असल्याचे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष बी. के. देवरे यांनी केले. महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य चंद्रकांत गोगड, प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे व्यासपीठावर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करुन करण्यात आला. उपप्राचार्य एस. एच. भामरे लेफ्ट. पी. आर. बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जांभळे, महाविद्यालय समिती सदस्य अलका शिंदे, लायन्स क्लब अध्यक्ष शैलेश बाकलीवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सुवर्णमहोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. उपप्राचार्य डॉ पी. जी. आंबेकर यांनी आभार मानले. समितीचे कार्याध्यक्ष व्ही. टी. थोरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमाड महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:06 PM
मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने ५० वर्षांची यशस्वी वाटचाल करून अनेक उच्चपदस्थ विद्यार्थ्यांना घडविले असल्याचे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष बी. के. देवरे यांनी केले. महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य चंद्रकांत गोगड, प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे व्यासपीठावर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करुन करण्यात आला.
ठळक मुद्दे महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.