या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी पी.एस. कोल्हे, गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या अभियान अंतर्गत ११ हजार कुटुंबासाठी १५५ शिक्षकांची व दहा पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सटाणा शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम राबविण्यात येत असून, यासाठी तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक (अंगणवाडी वर्कर प्राथमिक, माध्यमिक शिक्षक) काम करीत आहेत.
याप्रसंगी विस्तार अधिकारी विजय पगार, के.पी. पगार, केंद्रप्रमुख हिरालाल बधान, संजीव अहिरे, अभिमान भामरे, बी.आर.सी. कर्मचारी योगेश अहिरे, विजय पगारे, ललित शिंदे, सचिन नांद्रे व सोबत प्रगणक प्रकाश सोनवणे, सहदेव बच्छाव, राजेंद्र जाधव, साहेबराव देवरे आदी उपस्थित होते.
===Photopath===
040321\04nsk_39_04032021_13.jpg
===Caption===
सटाणा येथे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षण अभियानाला प्रारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे, गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे, शिक्षक व विद्यार्थी.