नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी दुपारी ऑक्सिजन भरताना झालेल्या गळतीच्या दुर्घटनेची चाैकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपल्या कामकाजास सुरुवात केली असून गुरुवारी सायंकाळी समितीचे अध्यक्ष व काही सदस्यांनी रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली आहे. येत्या पंधरा दिवसात समितीने आपला अहवाल शासनाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑक्सिजन गळतीच्या या दुर्घटनेत २२ कोरोना रुग्णांचा जीव गेला आहे. नाशिक महापालिकेच्या मालकीच्या या रुग्णालयात गेल्या वर्षीपासून कारोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात असून, एक महिन्यापूर्वीच या रुग्णालयात कोरोनाच्या अती गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजनचा प्रकल्प बसविण्यात येऊन त्या माध्यमातून अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले आहेत. तथापि, बुधवारी दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष भेटगुरुवारी सायंकाळी चौकशी समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व इतर सदस्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसमवेत झाकीर रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीची पाहणी केली. यावेळी गमे यांनी नेमकी घटना कशी घडली त्याबाबतची माहितीही जाणून घेतली. त्यांच्या पाहणीनंतर प्रसिध्दी माध्यमांनी विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता सदरची भेट ही नियमित असल्याचे सांगून त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, येत्या पंधरा दिवसात त्यांना चौकशी अहवाल शासनाला सादर करायचा आहे.ऑक्सिजनने भरलेल्या टँकरमधून टाकीत ऑक्सिजन भरताना गळती होऊन रूग्णालयात ऑक्सिजनवर व व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन त्यांचा काही क्षणातच मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीचे आदेश दिल्याने बुधवारी घटनेची माहिती घेण्यासाठी आलेले राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समितीची घोषणा केली होती. त्यानुसार समितीने आपले कामकाज सुरु केले आहे.
ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या चौकशीला समितीकडून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 1:16 AM
महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी दुपारी ऑक्सिजन भरताना झालेल्या गळतीच्या दुर्घटनेची चाैकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपल्या कामकाजास सुरुवात केली असून गुरुवारी सायंकाळी समितीचे अध्यक्ष व काही सदस्यांनी रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली आहे. येत्या पंधरा दिवसात समितीने आपला अहवाल शासनाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ठळक मुद्देझाकीर हुसेन रुग्णालयाला भेट : पंधरा दिवसांत शासनाला अहवाल