इगतपुरी : तालुक्यातील साकूर परिसरातील अनेक गावांना नेहमीच खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत असल्यामुळे याची दखल घेत साकूर ते खापराळे या नवीन वीजवाहिनी उपकेंद्राच्या भूमिपूजन कामाचा शुभारंभ ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते इगतपुरी तालुक्यातील साकूर उपकेंद्र येथे खापराळे या ठिकाणाहून २२ किलोमीटर अंतर असलेल्या सुमारे २.५ कोटी रुपये निधीच्या कामाचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे भविष्यात या परिसरातील अनेक गावांचा विजेचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. आजपर्यंत साकूर अंतर्गत येणाऱ्या गावांना सातपूर येथून वीजपुरवठा केला जात होता;परंतु जवळपास २.५० कोटी रुपये मंजूर करून साकूर परिसरातील महत्त्वाचा असणारा वीजप्रश्न कायमचा मार्गी लागला असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. याआधी साकूर उपकेंद्र येथे ५० किमी अंतरावरून लाईन येत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या कार्यक्रमाप्रसंगी रतन पाटील जाधव, अभियंता अमित धोरणकर, बाळासाहेब गाढवे, राष्ट्रवादी युवक नेते विजय जाधव, भिका पानसरे, नारायण भोसले, सोपान टोचे, महेश गाढवे, विनायक सहाणे, स्वीय सहायक संजय डावरे, रामदास गाढवे, विद्युत वितरणचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो
साकूर येथे नवीन वीज उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन करताना जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे. समवेत ज्येष्ठ नेते रतन पाटील जाधव, अभियंता अमित धोरणकर, भिका पानसरे व इतर. (०४ नांदूरवैद्य १)
===Photopath===
040621\030004nsk_6_04062021_13.jpg
===Caption===
०४ नांदूरवैद्य १