लखमापूर : दिंडोरी तालुक्याला द्राक्षे पिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु मागील हंगामात कोरोनामुळे या द्राक्षे पंढरीतील शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. परंतु आता पुन्हा द्राक्षे उत्पादक नव्या जोमाने शेतीकामात व्यस्त झाले आहेतझ द्राक्षे पिकाला या हंगामात कशा पद्धतीने चांगले उत्पन्न घेता येईल यासाठी आॅक्टोबर छाटणीची पूर्व तयारी करण्यात द्राक्ष उत्पादक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी द्राक्षे बागेत चांगले पिक घेऊन ही सुरु वातीचा काही कालखंड जर सोडला तर नंतर मात्र द्राक्षे पिकाला कुठल्याही प्रकाराचा हमी भाव मिळाला नाही. भरपूर भांडवल खर्च करूनही पदरात कुठलाही मोबदला हातात न पडल्यामुळे शेतकरी हतबल झाला होता.परंतु हे सर्व आलेले कटु अनुभव बाजुला सावरून बळीराजाने आॅक्टोबर छाटणीपूर्व मशागतीस प्रारंभ करून द्राक्षे पिकांची काडी तयार होण्यासाठी विविध बँका, सोसायटी, पतसंस्था व मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. तसेच छाटणीपुर्व मशागतीस प्रारंभ करून महागडे किंमतीचे औषधांची खरेदी करून वेळोवेळी नियोजन करून वेगवेगळ्या औषधांची फवारणी करण्यासाठी भर दिला आहे. तसेच संततधार पावसाने काही वेळेस तणनाशक फवारणी करण्यासाठी शेतकरी वर्गाला मोठ्याप्रमाणात अडचणी निर्माण झाल्याने द्राक्षे बागामध्ये मोठ्या प्रमाणात तण, वेगवेगळ्या स्वरु पाची गवत वाढल्याने ते काढण्यासाठी शेतकरी वर्गाला तारे वरची कसरत करावी लागते आहे.सध्या शेतकरी वर्ग द्राक्षे पिक घेण्यासाठी जे मजुर लागतात. त्याच्या शोधात आहे. त्यासाठी पेठ, सुरगाणा, येथील काही ठराविक ठिकाणाहून मजुर आणण्यासाठी बळीराजाची धावपळ होत आहे.तसेच द्राक्षे पिकावर फवारणीसाठी जवळजवळ 70 टक्के शेतकरी वर्गाने यंत्रिक साधनांचा वापर करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे सध्या तरी कमी मजुरांमध्ये काम करून घेतले जात आहे.मागील हंगामात कोरोना मुळे द्राक्षे पिकांची वाताहत झाल्याने व कुठल्याही प्रकाराचा शेवटपर्यंत हमी भाव न मिळाल्याने प्रत्येक शेतकरी यंदा भांडवलावाचून तळमळाणार आहे. यामुळे विविध बँकांनी द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गासाठी विशेष स्वरु पाची पॅकेज पध्दती उपलब्ध करून द्यावी. त्यातून द्राक्षे हंगाम योग्य घेता येईल.- अजित कड, द्राक्ष उत्पादक, दहेगाव
दिंडोरी तालुक्यात द्राक्षे छाटणीपूर्व मशागतीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 5:55 PM
लखमापूर : दिंडोरी तालुक्याला द्राक्षे पिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु मागील हंगामात कोरोनामुळे या द्राक्षे पंढरीतील शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. परंतु आता पुन्हा द्राक्षे उत्पादक नव्या जोमाने शेतीकामात व्यस्त झाले आहेतझ द्राक्षे पिकाला या हंगामात कशा पद्धतीने चांगले उत्पन्न घेता येईल यासाठी आॅक्टोबर छाटणीची पूर्व तयारी करण्यात द्राक्ष उत्पादक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देमजुर आणण्यासाठी बळीराजाची धावपळ होत आहे.