शहरातील रावळगाव नाका परिसरात मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या भूखंडावर भाजीपाला बाजारपेठेसाठी मोठे संकुल उभारण्यात आले आहे. त्यात व्यापारी गाळे व भाजीपालासाठी सुमारे दीडशे बैठै ओटे बांधले आहेत. हे संकुल बांधून दहा वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण झाला आहे, परंतु व्यावसायिक व मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथे बाजार सुरू होऊ शकलेला नाही. सध्या हे संकुल भग्नावस्थेत आहे, तर या संकुलात दिवसभर रिकामटेकड्यांची गर्दी असते. सायंकाळनंतर तर अनेक अवैध धंदे सुरू असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्याकडे मनपा व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. भाजीपाला व्यावसायिक येथे येण्यासाठी तयार आहेत, परंतु सोईसुविधांचा अभाव, विद्युत पुरवठा, पाण्याचा प्रश्न अशी अडचणी असल्याचे विक्रेते सांगतात. सुरुवातीला काही महिने येथे बाजार सुरू झाला, पण असुविधांमुळे पुन्हा बाजार रस्त्यावर आला. परिसरात रावळगाव नाका, चर्च रस्ता, भायगाव रस्ता, सोमवार बाजार या भागांतील मुख्य रस्त्यावर भाजी बाजार भरतो आहे. हा रस्ता मालेगाव शहरातून ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे येथे मोठी गर्दी होते, तर रस्त्यावरच्या दुकानदारीमुळेही लहान-मोठे अपघात होऊन वादाचे प्रसंग निर्माण होतात.
इन्फो
मनपाची उदासीनता
संकुलात तयार करण्यात आलेल्या ओट्यांचे लिलावही झाले आहेत, तरीही व्यावसायिक येथे स्थलांतरित होत नाहीत. पूर्वी रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी लगतच्या कॅम्प पोलीस ठाण्याच्या समोरच्या मोकळ्या जागेत दर सोमवारी आठवडे बाजार स्थानिक प्रशासनाच्या मदतीने भरत होता. आता तोही बंद करण्यात आल्याने बाजार पुन्हा रस्त्यावर आला आहे. मनपाच्या उदासीनतेमुळे शहरातील चांगल्या वास्तूला अवकळा प्राप्त झाली आहे.
फोटो - १४ मालेगाव संकुल
मालेगाव कॅम्पातील भग्नावस्थेत असलेले व्यापारी संकुल.
===Photopath===
140621\14nsk_25_14062021_13.jpg
===Caption===
फोटो - १४ मालेगाव संकुल मालेगाव कँम्पातील भग्नावस्थेत असलेले व्यापारी संकुल.