नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकशाही प्रणाली अधिकाधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने निवडणूक कायद्यात व प्रणालीत अलीकडच्या काळात केलेल्या विविध सुधारणा, दुरुस्त्यांबाबत अद्यापही निवडणुकीचे कामकाज पाहणारे अधिकारी अवगत नसल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आल्याने आता निवडणूक अधिकाºयांचे ज्ञान तपासण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून, देशपातळीवरील निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक अधिकारी व नायब तहसीलदारांची ‘आॅनलाइन’ एकाच वेळी परीक्षा घेण्याचे ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्याच्या निवडणूक आयोगांना तशा सूचना दिल्या असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी व नायब तहसीलदारांचे निवडणूकविषयक सामान्यज्ञान जाणून घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मध्यंतरी आयोगाने वयाच्या १२ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय लोकशाही व निवडणूक प्रणालीविषयक स्पर्धा परीक्षा घेऊन त्यांच्यात निवडणूक कायदा व मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तालुका व जिल्हापातळीवर परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकाºयांचे यासंदर्भातच पुण्याच्या यशदा येथे कार्यशाळा घेण्यात आली. आगामी लोकसभा व निवडणुकीपूर्वी निवडणुकीचे कामकाज पाहणाºया सर्व अधिकाºयांना कायदेशीर तरतुदींसह परिपूर्ण व सक्षम करण्याचा भाग म्हणून त्यांच्या ज्ञानाची अगोदर तपासणी व नंतर पुन्हा तयारी करून घेण्याचा भाग म्हणून येत्या १४ मे रोजी अधिकाºयांना त्यांच्या बसल्या जागीच ‘आॅनलाइन’ ही परीक्षा द्यावी लागणार आहे. नाशिक व औरंगाबाद विभागाच्या निवडणूक अधिकाºयांची एकाच वेळी परीक्षा होणार असून, या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास अधिकाºयांना अभ्यास करून पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
आयोग घेणार निवडणूक अधिकाऱ्यांची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:15 AM