शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

कमीशन बारा रूपये, खर्च ५१ रूपये ! रेशन दुकानदारांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 7:17 PM

नाशिक : फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रती कार्ड एक किलो साखर दरमहा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका रेशन दुकानदारांनाच बसू लागला असून, चार ते चाळीस किलो पर्यंत दरमहा साखर वाटपासाठी मिळणा-या  दुकानदारांना मात्र चलन भरतांना साखरेच्या मिळणाºया कमिशनपेक्षा चार ते चाळीस पट जादा रक्कम बॅँकेत भरण्याचा भुर्दंड सोसावा लागत ...

नाशिक : फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रती कार्ड एक किलो साखर दरमहा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका रेशन दुकानदारांनाच बसू लागला असून, चार ते चाळीस किलो पर्यंत दरमहा साखर वाटपासाठी मिळणा-या  दुकानदारांना मात्र चलन भरतांना साखरेच्या मिळणाºया कमिशनपेक्षा चार ते चाळीस पट जादा रक्कम बॅँकेत भरण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. दुकानदारांच्या या आर्थिक व्यथेशी कोणतेही सोयरसुतक नसलेले पुरवठा खाते मात्र साखर न उचलणाºया दुकानदारांना नोटीसा पाठवून मानसिक छळ करीत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गंत अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रती कार्ड एक किलो साखर देण्यात येत असल्यामुळे अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या पाहता प्रत्येक रेशन दुकानदारास चार ते चाळीस किलो या प्रमाणातच दरमहिन्याला साखरेचा कोटा दिला जातो. या साखरेसाठी दुकानदाराने साखरेवर मिळणारे कमीशनची रक्कम वजा जाता उर्वरित रकमेचे चलन म्हणजेच बॅँकेत पैसे जाऊन पैसे भरावे लागतात. सध्या रेशनवर मिळणा-या साखरेचा दर २० रूपये किलो इतका असून, त्याच्या विक्रीतून दुकानदारास एका किलोमागे दिड रूपये कमिशन मिळते. म्हणजे एका दुकानदाराला जर चार किलोच साखरेचा कोटा मंजुर असेल तर त्याने सहा रूपये कमिशनचे वजा करून ५४ रूपये चलनाद्वारे भरणे अपेक्षित आहे. परंतु ज्या राष्टयकृत बॅँकेत रेशन दुकानदारांना चलन भरावे लागते त्यात कमीत कमी ३०१ रूपयांचे चलन भरावे लागते. राष्टÑीयकृत बॅँका तीनशे रूपयांच्या आतील रक्कम चलनाद्वारे भरून घेत नाही. त्यामुळे दुकानदाराला तीनशे रूपयांहून अधिक रक्कम बॅँकेत चलनाद्वारे भरली तरच पुरवठा खाते त्यांना परमीट अदा करते ही वस्तुस्थिती आहे. म्हणजेच रेशन दुकानदाराला चार किलो साखरेच्या सहा रूपये कमिशनसाठी तीनशे रूपयांचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे बºयाचशा दुकानदारांना हा घाट्याचा व्यवसाय वाटू लागला असून, ज्यांना चार ते वीस किलो पर्यंत दरमहा साखर मिळते व ज्यांना तीनशे रूपयांच्या आत कमीशनची रक्कम मिळणार आहे अशा दुकानदारांना घरातून रक्कम भरून अंत्योदयच्या लाभार्थ्यांना साखर वाटप करावी लागत आहे. त्यामुाळे गेल्या तीन महिन्यांपासून दुकानदार नाखुषीने साखरेची उचल करीत असून, काहींनी याच कारणास्तव साखर न उचलल्याने पुरवठा खात्याने त्यांना नोटीसा पाठवून फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.