शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:07 IST

शहरातील मिळकत करवाढीमुळे वादग्रस्त ठरलेले आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर गेले असून, त्यांच्या अनुपस्थितीत या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे असणार आहे. ते गुरुवारी (दि. २६) या पदाचा कार्यभार स्वीकारतील.

नाशिक : शहरातील मिळकत करवाढीमुळे वादग्रस्त ठरलेले आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर गेले असून, त्यांच्या अनुपस्थितीत या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे असणार आहे. ते गुरुवारी (दि. २६) या पदाचा कार्यभार स्वीकारतील.  आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्तिगत कारणामुळे तसेच विदेश दौऱ्यामुळे ही रजा घेतली असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयास पाच दिवसांपूर्वीच कळविले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यभार स्वीकारणार आहेत.  गेल्या महिनाभरापासून शहरातील करवाढीचा विषय गाजत आहे. आधी सर्व मिळकतींची करवाढ करण्यात आल्यानंतर आयुक्तांनी जमिनींचे करमूल्य निर्धारित करण्याची अधिसूचना काढली होती. त्यावरून शहरात प्रचंड गोंधळ आणि उद्रेकाचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण महापालिका हद्दीवरच कर लावण्याचा मनोदय आयुक्तांनी व्यक्त केला आणि त्यानुसार मिळकती आणि भूखंडावर करवाढ केली. मोकळ्या भूखंडांमध्ये शेतीक्षेत्राचा समावेश असल्याने शेतकºयांनी त्याविरोधात मेळावे घेऊन विरोध सुरू केला. आयुक्तांनी बॅकफुटवर येत हरित क्षेत्रातील शेतीवर कर नसल्याचा दावा करतानाच करमूल्यातही पन्नास टक्के कपात केल्याची घोषणा केली. परंतु आता रहिवासी क्षेत्रातच मोठ्या प्रमाणात शेती असल्याने शेतकºयांमधील नाराजी कायम होती. राजकीय पक्षांना ही धग सहन करणे शक्य नसल्याने तेही रस्त्यावर उतरले होते.चर्चा आणि संभ्रमआयुक्त मुंढे हे पंधरा दिवसांच्या रजेवर जात असल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.  जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी कार्यभार स्वीकारण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश.  मुंढे यांनी व्यक्तिगत कारणामुळे तसेच विदेश दौºयामुळे ही रजा घेतली असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयास पाच दिवसांपूर्वीच कळविले होते.उलटसुलट चर्चेला उधाणगेल्या २३ तारखेला सत्तारूढ भाजपाने विशेष महासभा बोलावून करवाढ स्थगित करण्याचा ठराव केला. याचवेळी महापालिकेबाहेर प्रचंड आंदोलन करण्यात आले. आयुक्तांचा निर्णय हा आचारसंहिता कालावधीत असल्याने अखेरीस त्याबाबत तक्रार करण्याचे ठरविण्यात आल्याने त्यावरून आणखीनच कायदेशीर गोंधळ निर्माण झाला. नेमके याच दरम्यान आयुक्त मुंढे हे पंधरा दिवसांच्या रजेवर जात असल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे