नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, दिवसाकाठी अडीच ते तीन हजार रुग्ण आढळत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण नाशिक शहरात आढळत आहेत. ८० ते ८५ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत असल्याचे सांगितले जात असले तरी उर्वरित ज्या गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल व्हायचे आहे, त्यांना बेडस् मिळत नसल्याच्या तक्रारी महापालिकेच्या हेल्पलाइनवरून प्राप्त होत होत्या. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी बुधवारीच (दि.२४) ऑडिटर्स आणि अभियंत्यांना खासगी रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर गुरुवारी डॉ. शिंदे नाशिकमध्ये आल्यांनतर आयुक्त कैलास जाधव आणि त्यांनी संयुक्तरीत्या खासगी रुग्णालयात जाऊन तपासणी केली.
यावेळी एचआरसीटीचा स्कोअर सातपेक्षा अधिक असेल, तर कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असताना काही ठिकाणी त्यापेक्षा कमी स्कोअर असलेले रुग्णही दाखल असल्याचे आढळले, तसेच काही ठिकाणी ८०:२० सूत्रानुसार रुग्ण दाखल होत नसल्याचे आढळले आहे. यावेळी डॉ. विजय पावस्कर, विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आदी उपस्थित होते.
===Photopath===
250321\25nsk_45_25032021_13.jpg
===Caption===
शहरातील खासगी रूग्णालयांमधील बेडसची माहिती घेताना ज्याचे कोविड बेड मॅनेजमेंटचे प्रमुख डॉ.सुधाकर शिंदे आणि आयुक्त कैलास जाधव आदी