नाशिक : माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही केवळ मोहिम नसून या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आरोग्य साक्षर करण्याचा शासनाचा मानस आहे. आपल्या कुटुंब,गांव, शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री व अधिका?्यांच्या बैठकीत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दीघावकर, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कायर्कारी अधिकारी, लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, महसूल उपायुक्त दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मनापाचे कोरोना नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, या मोहिमेतून आपल्याला राज्याचा, जिल्ह्यांचा हेल्थ मॅप तयार करता येणार आहे. विविध माध्यमातून आपण या मोहिमेंतर्गत जनतेपर्यंत पोहचणार आहोत. त्यामुळे सर्वेक्षणासोबतच व्यापक स्वरूपाची जनजागृती आपल्याला करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्यांतील स्थानिक कला व कलावंतांचाही सहभाग वाढवावा. प्रत्येकाला आपल्या कुटुंबासाठी, गाव, जिल्हा व राज्यासाठी आरोग्यासाठी जे जे काही आवश्यक आणि गरजेचे आहे, ते ते करावे लागणार आहे, प्रतिबंधात्मक उपायांसाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. काही लोक गृहविलगीकरणातही बाहेर फिरताना दिसून येत आहेत, त्यांनी आपल्या स्वत:सोबत, कुटुंब, समाज यांचीही काळजी घ्यायला हवी. भविष्यातील लॉकडाउन टाळायचे असेल तर आपल्याला कोरोना प्रतिबंधात्मक जीवनशैली अंगवळणी पाडून त्या जीवनशैलीच्या अंगिकार करावा लागेल असेही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले .नाशिकचा मृत्यदर राज्यात सर्वात कमी म्हणजे १.६ इतका असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाशिक जिल्ह्याचा दर एकास ३० इतके आहे. औषधे, इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारी व महापालिकेच्या रूग्णालयांमध्येच त्यांचा जास्तीतजास्त साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत औषधसाठ्याची, किंमतीची नियमित तपासणी करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात २४ ते २८ मे.टन इतका आॅक्सिजन गरजेचा असून नाशिक जिल्ह्यातील स्थानिक उद्योगांच्या सहकार्यातून त्याची दररोज ५५ मे. टन इतकी निमिर्ती केली जात आहे, त्यामुळे आजच्या स्थितीत आॅक्सिजनचा तुटवडा नाही, तो पुरेसा उपलब्ध असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्याचा रिकव्हरी दर ८७ इतका आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत आम्हाला ७३ लाख इतक्या लोकसंख्येपर्यंत पोहोचायचे आहे, आत्तापर्यंत आम्ही २० लाख लोकांपर्यंत पोहोचलो असल्याचे नमूद केले.