नाशिक : वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयात शुक्र वारी (दि.११) वन सैनिक हुतात्मा दिनाच्या निमित्ताने नाशिक पूर्व-पश्चिम, वन्यजीव विभागाच्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील हुतात्मा स्मारकाच्या परिसरात पहिल्यांदाच एकत्र येत वन, वन्यजीव संरक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती देणाºया राज्यातील सर्व हुतात्मा वन सैनिकांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.नाशिक वनवृत्ताच्या मुख्यालयात या दिनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून शहिदांच्या स्मरणार्थ वन हुतात्मा स्मारक उभारणीचे काम सुरू होते. काही दिवसांपूर्वीच हे स्मारक बांधून पूर्ण झाले. शुक्र वारी स्मारकाची सजावट करून सर्वप्रथम मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांनी हौतात्म्य पत्करलेल्या व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारकावर पुष्प अर्पण केले. जंगलतोड, बेसुमार खनिजसंपत्तीची लूट, वन्यजिवांची छुपी शिकार आणि पर्यावरणाचा -हास यावर अंकुश लावण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहणे हीच खरी हुतात्मा वनसैनिकांना श्रद्धांजली ठरेल, असे गुदगे म्हणाले.यावेळी वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर, पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, विभागीय वनाधिकारी स्वप्नील घुरे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी अनिल आहिरराव यांच्यासह दोन्ही परिक्षेत्रांतील वनरक्षक उपस्थित होते. सर्वांनी सामाजिक अंतर राखत शहीद वनसैनिकांना सॅल्युट केले.२०१३पासून पाळला जातो दिवस११ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय वन हुतात्मा दिन’ पाळण्यात येतो. २०१३पासून वन व पर्यावरण मंत्रालयाने हा दिन जाहीर केला आहे. ११ सप्टेंबर १७३७ रोजी वृक्षतोडीचे आदेश आल्यानंतर बिष्णोई समाजाने याविरु द्ध आवाज उठविला होता. यावेळी ३६३ लोकांनी बलिदान दिले होते. भारतीय वनसेवेतील अधिकारी पी. श्रीनिवास यांची १९९१मध्ये कुख्यात गुंड वीरप्पन याने हत्या केली होती. देशात मागील पाच वर्षांत १६२ वन कर्मचारी शहीद झाले आहेत.
वन-वन्यजीव संवर्धनासाठी कटीबध्दता हीच खरी श्रध्दांजली : नितीन गुदगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 7:06 PM
११ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय वन हुतात्मा दिन’ पाळण्यात येतो. २०१३पासून वन व पर्यावरण मंत्रालयाने हा दिन जाहीर केला आहे. ११ सप्टेंबर १७३७ रोजी वृक्षतोडीचे आदेश आल्यानंतर बिष्णोई समाजाने याविरु द्ध आवाज उठविला होता.
ठळक मुद्देशहिदांच्या स्मरणार्थ वन हुतात्मा स्मारक उभारणी