नाशिक : राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर अतिरिक्त ठरविण्याच्या निर्णयाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्थगिती दिली आणि कर्मचाऱ्यांच्या संखेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती नियुक्त केली, परंतु दोन्ही निर्णयाला शासनानेच फाटा दिला आहे. समितीची मुदत संपली तरी बैठकच घेण्यात आली नाही आणि दुसरीकडे गेल्यावर्षीच्या आकृतीबंध जैसे थे ठेवण्यात आल्यानंतरही अतिरिक्त ठरविलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन मात्र आॅफलाइन सुरू आहेत.शिक्षण खात्याच्या घोळामुळे २०१३ या वर्षातील पटपडताळणीचे निकष वर्षभराच्या विलंबानंतर म्हणजेच गेल्यावर्षी लागू करून त्या आधारे राज्यभरातील सुमारे ५५ हजार शिक्षक आणि शिक्षकेतरांना अतिरिक्तठरविण्यात आले. अनेकांना तर पटसंखेतील एक पद कमी झाले तरी अर्धवेळ करून त्यांचे वेतन कमी करण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर संस्थांचालकांनी आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी राज्यव्यापी बंद पुकारला होता.
धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती नियुक्त
By admin | Published: May 15, 2015 1:13 AM