सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन मंडळ यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकºयांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विनायक तांबे व उपसभापती सुधाकर शिंदे यांनी दिली.सिन्नर येथे गुदामांची उपलब्धता नसल्याने शेजारच्या संगमनेर तालुक्यातील वखार महामंडळाच्या गुदामात धान्य ठेवून शेतकºयांना या योजनेचा लाभ घेता येईल. दरम्यान, सिन्नर बाजार समितीकडे वावी उपबाजार आवारात असलेले ५०० मेट्रिक टनाचे गुदाम बाजार समितीने शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत किमान आधारभूत किमतीने मका खरेदीसाठी तहसीलदार सिन्नर यांच्याकडे यापूर्वीच दिलेले आहे. यंदाच्या वर्षात त्या गुदामाचा वापर केला जाणार आहे. वखार महामंडळाचे गुदाम मुसळगाव औद्योगिक वसाहतीत असल्याकारणाने शेतमालाच्या साठवणुकीसाठी वापरता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन जवळील संगमनेर तालुक्यातील वखार महामंडळाच्या गुदामाचा आधार घेण्यात आला आहे.तालुक्यातील या योजनेमध्ये भाग घेणाºया इच्छुक शेतकºयांनी संगमनेर येथील वखार महामंडळाच्या गुदामाच्या पावतीवर ६ टक्के व्याजदराने १८० दिवसांकरिता तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, करडई, सूर्यफूल, सुपारी, गूळ, वाघ्या घेवडा, काजू बी या शेतमालाच्या तारणावर चालू बाजारभावाने किमतीच्या ७५ टक्के किंवा हमीभावाच्या ७५ टक्क्यांपेक्षा जी रक्कम कमी असेल ती कर्ज म्हणून मिळेल.ज्वारी, बाजरी, मका व गहू या शेतमालाच्या तारणावर चालू बाजारभावाने किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ५०० रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तितके कर्ज उपलब्ध होईल. शेतकºयांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने सचिव विजय विखे यांनी केले आहे.शेतमाल तारण कर्जासाठी काही अटी व शर्ती ठरवून दिलेल्या आहेत. माल मोजून प्रत पाहून चांगल्या प्रतीचा माल ठेवून पावती दिली जाईल, खराब/कमी प्रतीचा/बोगस शेतमाल तारण ठेवला जाणार नाही, ओला शेतमाल तारण ठेवला जाणार नाही. शेतमाल अयोग्य प्रतीचा अथवा खराब असल्यास ठेवला जाणार नाही.
शेतमाल तारण कर्ज योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 7:02 PM
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन मंडळ यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकºयांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विनायक तांबे व उपसभापती सुधाकर शिंदे यांनी दिली.
ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी बाजार समितीचा उपक्रम