लासलगाव : वेफको संस्थेचे शेतमाल विक्र ी केंद्र सुरू करावे, या सभासदांच्या मागणीनुसार शासनाच्या नियमनमुक्तीच्या निकषाप्रमाणे कायदेशीर पणनचा परवाना घेऊन शेतकरीहित जोपासता येईल, अशी व्यवस्था उभी करून लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन नाफेडचे माजी उपाध्यक्ष व वेफकोचे संस्थापक अध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी केले.वेफको या भाजीपाला व फळबाग सहकारी खरेदी-विक्री संस्थेच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे संचालक अशोक नागरे, केदू बोरगुडे, नानासाहेब वाळूंज, रत्नमाला खडांगळे, सरव्यवस्थापक संजय होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.वेफकोचे सरव्यवस्थापक संजय होळकर यांनी सभासदांच्या भक्कम पाठींब्यामुळे संस्थेची या आर्थिक वर्षात चांगली उलाढाल झाली असून लेखा परीक्षणास ‘अ’ वर्ग मिळाला असून सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. यावेळी अहवाल वाचन करून सभेसमोर आलेले विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.सभेस संचालक निवृत्ती वावधाने, उत्तम घोटेकर, शिवनाथ सदाफळ, दिनकर जगताप, किशोर होळकर, अनिल बोचरे, सुनंदा घोटेकर, व्यवस्थापक संजय सोनवणे यांच्यासह यशोदा होळकर, मनीषा होळकर, बी. वाय. होळकर, संजय पाटील , प्रल्हाद खडांगळे, ज्ञानेश्वर गरड व सभासद उपस्थित होते. (वार्ताहर)
‘वेफको’ सुरू करणार शेतमाल विक्री केंद्र
By admin | Published: August 01, 2016 12:23 AM