आम्ही सुवर्णकार मंडळ संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी बबनराव घोलप, मीनाताई सोनार, राजेंद्र कपोते, गोपाळराव कुलथे, सुरेखा कपिले, मंगेश लोळगे, जीवन पोतदार, दिलीप शहाणे आदी.आम्ही सुवर्णकार मंडळातर्फे आयोजित सर्वजातीय वधू-वर, पालक परिचय मेळाव्यात ११ जोडप्यांचा सामुदायिक विवाह लावून देण्यात आला. तर वधू-वर परिचय मेळाव्यात सात इच्छुकांचा विवाह निश्चित करण्यात आला. उपनगर येथील इच्छामणी लॉन्समध्ये आम्ही सुवर्णकार मंडळातर्फे गुरुवारी सर्व जातीय वधू-वर, सूचक, पालक परिचय व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. सामुदायिक विवाह सोहळ्यात विविध जाती-धर्माच्या ११ जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला. यामध्ये विशेष करून एका अंध जोडप्याचादेखील विवाह लावण्यात आला. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष मीनाताई सोनार यांच्या हस्ते वधू-वरांना मणी मंगळसूत्र, जोडवे, कपडे, चप्पल-बूट, नथनी, ओढणी आदी साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, पंकज भुजबळ, राजेंद्र कपोते, गोपाळराव कुलथे, मंगेश लोळगे, जीवनशेठ पोतदार, शशिकांत लोळगे, सुरेखा कपिले, चंद्रकांत गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वधू-वर परिचय मेळाव्यात सात इच्छुकांचा विवाह निश्चित करण्यात आला. राज्यभरातून वधू-वर परिचय व सामुदायिक विवाह सोहळ्यास विविध जाती-धर्माचे समाजबांधव, महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष बोराडे यांनी केले. सूत्रसंचालन रमेश डहाळे व राजू आहेर यांनी केले. आभार मीनाताई सोनार यांनी मानले. यावेळी अरुण कोळी, भास्कर टेहरे, दिलीप शहाणे, सुहास बार्शीकर, भगवान सहाणे, विजय भडकवडे, जयप्रकाश घुमटकर, लंकाबाई हगवणे आदी उपस्थित होते.
सुवर्णकार मेळाव्यात सामुदायिक विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:50 PM