येवला : शहरामध्ये माहेश्वरी समाज व माहेश्वरी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक तुलसी विवाह (तिरथ)चे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यामध्ये माहेश्वरी समाजातील असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. त्यातील ३७ महिलांनी ४ दिवस निरंकार उपवास केले होते.यावेळी विविध कार्यक्र माअंतर्गत व्रतसंकल्प, गणेशस्थापना, गोपुजन, राधा-कृष्णाचा साखरपुडा, कुंकू, मेंहदी, बे, दिपोउस्वह, दही हांडी, गोवर्धन पर्वत, ५६ भोग प्रसाद, फुलोकी होली मध्ये राधा-कृष्णावर रंगिबेरंगी पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर भजनसंध्या, संगीतसंध्या आदी कार्यक्र म संपन्न झाले. व कन्यादान लॉन्स येथे राधा-दामोधर विवाहाने सोहळ्याची सांगता झाली.या निमित्ताने शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच बाहेर गावाहून देखील या कार्यक्र मासाठी असंख्य भाविक येथे दाखल झाले होते.कार्यक्र मास महिला मंडळाच्या अध्यक्ष विष्णुकांता अट्टल, सेक्रेटरी ज्योती काबरा, अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटनेच्या उपाध्यक्ष शैला कलंत्री, पुजा काबरा, प्रेमा अट्टल, स्मिता सोनी, अंजली राठी, सोनल राठी, पद्मा हेडा, अनिता मुंदडा, आरती काबरा, माधुरी अट्टल, शोभा राठी, कुसुम कलंत्री, मंगल मुंदडा, मनिषा राठी, अर्चना मुंदडा, अनुराधा मारशा, वंदना मुंदडा, शैला भराडीया, सुमित्रा मिश्रा, उमा अट्टल, अंकिता अट्टल, वैष्णवी गांधी आदि उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी युवक मंडळाने परिश्रम घेतले.
माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने येवल्यात सामुदायिक तुलसी विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 9:14 PM
येवला : शहरामध्ये माहेश्वरी समाज व माहेश्वरी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक तुलसी विवाह (तिरथ)चे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्दे माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी युवक मंडळाने परिश्रम