नाशिक : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या वतीने एका विद्युत प्रकल्पासाठी ४०० केव्ही डबल सर्किट अतिउच्च दाबाची वाहिनी टाकण्याचे काम सुरू असून, शेतकरी त्यास विरोध करीत आहेत; मात्र या कामामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होईल त्यांना सरकार भरपाई देण्यास तयार असल्याचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सांगितले. जिल्'ातील निफाड, दिंडोरी व चांदवड तालुक्यांतील बागायती शेतीमधून पॉवरग्रीड कंपनीचे अति उच्चदाबाची वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ही वाहिनी ५५ किलोमीटरमधील बागायती शेतीमधून जाणार असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी सदर कामास तीव्र विरोध केला आहे. काही शेतकऱ्यांनी तर केंद्रीय ऊर्जामंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणी आपली कैफियत मांडली होती. यावरून खासदार हरिशचंद्र चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रकल्पास पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. यावेळी कंपनीचे अतिरिक्त व्यवस्थापक पी. के. ठाकूर हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकल्पाचे पुनर्सर्वेक्षण करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश दिले होते.
टॉवरलाइनमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देणार
By admin | Published: December 04, 2014 11:39 PM