कळवण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कळवण नगरपंचायतच्यावतीने महिलांसाठी धावणे आणि चालण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत कु प्रियंका ठाकरे, सौ मनिषा पगार आणि सुमन अहिरे यांनी प्रथम क्र मांक मिळविला. स्पर्धेतील विजेत्यांना कळवणच्या प्रथम नगराध्यक्षा सुनीता पगार, नगरसेविका अनिता जैन,रंजना पगार, रंजना जगताप,अनुराधा पगार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मयुर बहिरम, उपनगराध्यक्ष कौतिक पगार, नगरसेवक अतुल पगार, जयेश पगार, दिलीप मोरे, हरिश्चंद्र पगार, उद्योजक सुनील जैन,उद्योगपती राजेद्र खैरनार, जितेंद्र पगार, गौरव पगार, डॉ सम्राट पवार, मुख्याधिकारी डॉ सचीन पटेल, प्रशासकीय अधिकारी बंगाळ आदी मान्यवर उपस्थित होते.महिला दिनाचे औचित्य साधून धावणे व चालण्याची स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. धावण्याच्या खुला गट स्पर्धेत प्रियंका ठाकरे प्रथम तर वेदिका मंडलिक द्वितीय तर शुभागी पवार हिने तृतीय क्र मांक मिळविला. १६ ते ४९ वर्ष वयोगटातील चालण्याच्या स्पर्धेत सौ मनिषा पगार प्रथम तर मंगला पाटील द्वितीय आणि मंगला खांडवी यांनी तृतीय क्र मांक मिळविला. ५० वर्षे वरील वयोगटातील चालण्याच्या स्पर्धेत सुमन आहिरे यांनी प्रथम तर साळुका दाणी यांनी द्वितीय आणि केशरबाई माळी यांनी तृतीय क्र मांक मिळविला. सुमनताई देवरे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. आरोग्य सुविधा डॉ. सम्राट पवार यांनी उपलब्ध करुन दिली होती. आनंद पतसंस्थेचे व्यवस्थापक छगन सोनवणे यांनी सूत्रसंचालन तर आभारप्रदर्शन नगरसेविका सौ अनिता जैन यांनी केले.
कळवण नगरपंचायततर्फे महिलांसाठी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 5:41 PM
महिला दिन : प्रियंका ठाकरे, मनिषा पगार, सुमन अहिरे विजेते
ठळक मुद्देसुमनताई देवरे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. आरोग्य सुविधा डॉ. सम्राट पवार यांनी उपलब्ध करुन दिली होती.