सिन्नर : प्रवरा शिक्षण संस्था संचलित तालुक्यातील चिंचोली येथील सरविश्वेश्वरय्या इन्स्ट्यिूट आॅफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात तयारी स्पर्धा परीक्षेची या विषायावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेहोते.स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील वाढलेली स्पर्धा आणि नियोजनध्द तयारी या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेत गोरक्ष सांगळे यांनी ‘तयारी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची’ नईम तांबोळी यांनी ‘अभियांत्रिकीसाठी बँकिंग क्षेत्रातल्या विविध संधी’ व अमोल टाके यांनी ‘अभियांत्रीकीनंतर शासकीय नोकरीच्या विविध संधी’ या विषयांवर अभियांत्रिकीच्या विधार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी विठ्ठल के. खेमनर यांनी कार्यशाळा समन्वयक म्हणून काम पाहिले. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभागातील सर्व सदस्यांनी या कार्यशाळेच्या आयोजनात योगदान दिले.
चिंचोली अभियांत्रिकी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 5:47 PM