नाशिक : भाजपाविरोधी आलेल्या लाटेचा फायदा तसेच मध्यावधी निवडणुकांची शक्यता गृहित धरून शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत व आमदार अजय चौधरी यांनी रविवारी (दि़२९) जिल्ह्यात शिवसैनिक तसेच पदाधिकाºयांच्या बैठका घेतल्या़ कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी आलेल्या पदाधिकाºयांसमोर पक्षातील अंतर्गत वादच समोर आल्याने पदाधिकाºयांची कानउघाडणी करीत राऊत यांनी लगेचच बैठक गुंडाळली. सेनेच्या शालिमार येथील कार्यालयात झालेल्या शिवसेना पदाधिकाºयांच्या बैठकीत राऊत यांच्यासमोर नाराजांनी आपापल्या तक्रारी मांडल्या. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार राऊत व आमदार चौधरी यांच्यासमोर महापालिका निवडणुकीत निष्ठावंतांऐवजी आयारामांना कसे तिकीट वाटप करण्यात आले व त्याचे झालेले परिणाम याबाबत कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी तक्रारी केल्या़ यामुळे पक्षसंघटना वाढीऐवजी कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठीचा कार्यक्रम सर्वप्रथम सेनेला हाती घ्यावा लागणार असल्याचे दिसून आले. भाजपा-सेना युती सरकार सत्तेत येऊन सोमवारी (दि़ ३०) तीन वर्षे पूर्ण होत आहेत़ मात्र या तीन वर्षांच्या कालावधीत या दोन्ही पक्षांनी एकमेकांची उणीधुणी काढण्यातच धन्यता मानली आहे़ सरकारच्या तीन वर्षेपूर्तीच्या पूर्वसंध्येला उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखांनी पदाधिकाºयांच्या घेतलेल्या बैठकीत मध्य नाशिक विधानसभाप्रमुख असलेल्या पदाधिकाºयाचे पद काढून घेत उपमहानगरप्रमुख करून पदावनती करण्यात आल्याची खंत व्यक्त केली़, तर काही पदाधिकाºयांनी शिवसेनेतील पदाधिकाºयांमधील गट व तटामुळे पक्षाची दिवसेंदिवस वाताहत होत असल्याची तक्रार केली़ विशेष म्हणजे बैठकीत पदाधिकाºयांनी तक्रारीचा भडीमार करण्यास सुरुवात केल्याने अनेकांना बोलण्याची संधीच नाकारण्यात आली़ शिवसेनेची पक्ष बांधणीच्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली़, तर काहींनी सोशल मीडियाचा वापर पक्षवाढीसाठी करण्याच्या तसेच शहरातील रुग्णालयाच्या मुद्द्यावरून भाजपा पदाधिकाºयांमधील वादाचा सेनेने फायदा घेण्याची सूचना केली़ या बैठकीस जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, माजी महापौर अॅड. यतिन वाघ, महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर, माजी सभापती संजय चव्हाण, अॅड़ श्यामला दीक्षित आदींसह पदाधिकारी उपस्थित होते़झाले गेले विसरा : राऊतशिवसेनेचे बोट धरून मोठी झालेली भाजपा आता सेनेला संपविण्याची भाषा करते आहे़ आयारामांना संधी देऊन पक्ष वाढविणाºया भाजपाप्रमाणेच शिवसेनेनेही नवीन कार्यकर्त्यांना संधी तसेच सन्मान देऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. तर उत्तर महाराष्टÑ संपर्कप्रमुख राऊत यांनी आतापर्यंतच्या चुका टाळून पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याबाबत सांगितले़
नेत्यांसमोरच तक्रारींचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:50 AM