घोटी : तालुक्यातील तळेगाव येथील आदिवासी जमिनीची परस्पर विक्र ी करून वारसांची फसवणुक झाल्याचीतक्रारकरण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जय किसान आदिवासी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाº्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की तळेगाव येथील आदिवासी जमिन कमल दगडु जाधव तथा कमल दत्तु भवारी यांच्या वडीलोपार्जीत मालकीची आहे.या जमिनीतील प्लॉटवर जाधव मयत झाल्यानंतर त्यांची पत्नी भोराबाई लहानू जाधव यांचेनाव सात बारा उताº्यावर नाव दाखल आहे. भोराबाई जाधव मयत झाल्यानंतर त्यांना वारस नसल्याने सख्खे पुतणे व पुतणी असे दोघे पांडुरंग नामदेव उर्फ दगडु जाधव व पुतणी कमल दत्तु भवारी हे दोघे वारस आहेत. परंतु या मिळकतीवर कमल हिला डावलून पांडुरंग जाधव यांचे नाव दाखल करण्यात आले. कमल वारस असूनही तिचे नाव दाखल नसल्याने संबंधितांनी ही आदिवासी जमीन विक्र ांत विश्वास सावकार, शैलेश अर्जुन बोंदार्डे, नंदा पांडुरंग जाधव व पुष्पा पांडुरंग जाधव यांना परस्पर विक्र ी केली. कमलचा हिस्सा असल्याने ती अडचण करील म्हणून संबंधीतांनी कमलला अर्धा मोबदला देण्याचे सांगितले
जमिनविक्रीतून फसवणूक झाल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 5:53 PM