नाशिक : जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह पदाधिकाºयांनीही मंगळवारी (दि. ५) झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हाभरातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अनुपस्थित राहणाºया वैद्यकीय अधिकाºयांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित यांनी गटातच मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या असलेल्या वाडिवºहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर एकही वैद्यकीय अधिकारी नसताना त्यांच्याच गटात काननवाडी येथे तीन वैद्यकीय असल्याचे लक्षात आणून दिल्याने जिल्हा आरोग्य विभागाचा वैद्यकीय सेवेतील नियोजनशून्य कारभार सभागृहासमोर आला.जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी दिवसातून एक दोन तासासाठी येतात, तर दोन वैद्यकीय अधिकारी असतानाही जिल्ह्णातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सायंकाळी रुग्णांची तपासणी होत नसल्याचे लक्षात आणून देताना वैद्यकीय सेवेवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाºयांनी मंगळवारच्या सर्वसाधारण सभेसमोर केल्या. यात प्रामुख्याने नैताळे, म्हाळसाकोरे आणि वाडिवºहे येथील आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकाºयांची कमतरता असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, कमी रुग्णसंख्येच्या गावांमध्ये दोन ते तीन वैद्यकीय अधिकाºयांची नेमणूक करणाºया यंत्रणेवर सदस्य व पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली. आरोग्य व वैद्यकीय सेवेतील नाराजीचा सूर जिल्हा परिषदेत नव्याने रुजू होण्यासाठी चकरा मारत असलेले डॉ. विजय डेकाटे व सध्याचे जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी सुशील वाघचौरे यांच्या विरोधातही उमटला. सदस्यांसोबतच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांनी वादग्रस्त डेकाटे नकोच; परंतु जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी पदाची धुरा गेल्या चार वर्षांपासून सांभाळताना विशेष सुधारणा घडविण्यात अपयशी ठरलेल्या सुशील वाघचौरे यांनाही कार्यमुक्त करण्याची मागणी सदस्यांनी केली. डेकाटे यांच्या नियुक्तीवरून सभागृहात यावेळी दोन गट पडल्याचे दिसून आले. यातील सिमंनिती कोकाटे यांनी डेकांटेना जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून रुजू करून घेऊ नये, असा विरोधात ठराव सभागृहात मांडला. अश्विनी अहेर यांनी त्याला अनुमोदन दिले. परंतु विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे या मुद्द्यावर केवळ चर्चाच झाली. याविषयी कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नसला तरी, जिल्हा परिषद सदस्य नीलेश के दार यांच्यासह काही सदस्यांनी पावसाळ्याच्या काळात आरोग्य सुविधा कोलमडल्यास निर्णय घेण्यासाठी जबाबदार अधिकारी असावा यासाठी डेकाटेंना रुजू करून घेण्याच्या बाजूने मत मांडल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी डॉ. विजय डेकाटे यांनी रुजू होण्यासाठी अर्ज दिल्याचे सांगत त्यांना पदभार सोपविण्याविषयी प्रशासकीय स्तरावर सविस्तर विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, जिल्हा विकास नियोजन समितीद्वारे बांधकाम विभागाला आदिवासी विभागाच्या विकासासाठी २०१७-१८ या वर्षात रस्ते, पूल बांधणी व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झालेला नाही. आदिवासी भागात ३०५४, ०४०७ व ५०५४ लेखाशीर्षाखाली निधी मिळत नसल्याने आदिवासी भागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य भारती पवार यांनी केला. कुपोषण निर्मूलनासाठी प्रशासनाचे काम प्रशंसनीय असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी कुपोषित बालकांना पोषण आहारासाठी ग्राम बालविकास केंद्रातून बाहेर पडल्यानंतर अंडी व अन्य पोषण आहार मिळण्यास अडचणी येत असल्याने कुपोषित बालकांच्या कुटुंबांना अंडे देणारी कोंबडी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मुख्य कार्यकारी अधिक ारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, उपाध्यक्ष नयना गावित, बांधकाम व अर्थ सभापती मनीषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर, शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पगार आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.प्रशासनाला धरले धारेवर जिल्हा परिषद सदस्यांनी गत सर्वसाधारण सभेतील ठरावांवर प्रशासनाने काय कारवाई केली, असा प्रश्न करीत प्रशासनाला धारेवर धरले. यापूर्वी जिल्हा परिषदेची ९ मार्चला सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेत करण्यात आलेल्या ५० ठरावांपैकी प्रशासनाने केवळ एकाच ठरावावर कारवाई केल्याचा अहवाल सदस्यांच्या हातात सोपविल्याने संतप्त झालेल्या सदस्य व पदाधिकाºयांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यात जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश बोरसे, बाळासाहेब क्षीरसागर आदी सदस्यांनी शाळा व व्यायामशाळा निर्लेखनाच्या ठरावावर झालेल्या कार्यवाहीचा तपशील मागत प्रशासनाच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. वाघमारेंच्या माफीने वादावर पडदा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे सदस्य यशवंत शिरसाठ यांच्यविषयी अपशब्द वापरून त्यांचा अनादर केल्यामुळे वादाच्या भोवºयात सापडलेले लघु व पाटबंधारे विभागाचे अधिकारी चंद्रशेखर वाघमारे यांनी अखेर सर्वसाधारण सभेसमोर शिरसाठ यांची माफी मागितली. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सदस्य व पदाधिकाºयांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होण्यास मदत होणार आहे. वाघमारे आणि शिरासाठ यांच्यातील प्रकाराची माहिती घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मध्यस्थी केल्याने व वाघमारे यांनी सभागृहासमोर माफी मागितल्याने या प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात तक्रारींचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:04 AM
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह पदाधिकाºयांनीही मंगळवारी (दि. ५) झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हाभरातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अनुपस्थित राहणाºया वैद्यकीय अधिकाºयांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित यांनी गटातच मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या असलेल्या वाडिवºहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर एकही वैद्यकीय अधिकारी नसताना त्यांच्याच गटात काननवाडी येथे तीन वैद्यकीय असल्याचे लक्षात आणून दिल्याने जिल्हा आरोग्य विभागाचा वैद्यकीय सेवेतील नियोजनशून्य कारभार सभागृहासमोर आला.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : आरोग्याच्या विषयांवर गाजली सर्वसाधारण सभा