शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

सुरगाण्यात गैरहजर शिक्षकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

By admin | Published: December 26, 2015 11:59 PM

सुरगाण्यात गैरहजर शिक्षकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

सुरगाणा : तालुक्यातील ठाणगाव शाळेत लेखीपत्र देऊनही शिक्षक शाळेवर हजर न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांसह त्या दोन्ही शिक्षकांविरोधात बाऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.दरम्यान, संतप्त पालकांनी शाळेला कुलूपही ठोकले आहे. शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे २३१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पटसंख्येनुसार या शाळेत आठ शिक्षक मंजूर आहेत. मात्र कागदोपत्री सहा तर प्रत्यक्षात चारच शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत आहेत. इतर वर्गांना शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून या शाळेस शिक्षक देण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.सन २०१३ मध्ये ग्रामस्थ व पालकांनी शिक्षण विभागाकडे लेखी निवेदन देऊन शिक्षक देण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा ७ जुलै २०१५ रोजी निवेदन देण्यात आले. पंचायत समिती सभापती उत्तम कडू यांना निवेदन देण्यात आले. १७ डिसेंबरपर्यंत प्रतिनियुक्तीवर असलेले शिक्षक ठाणगाव शाळेत हजर न झाल्यास १८ डिसेंबरपासून शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार शाळेला कुलूपही ठोकण्यात आले होते. त्याच्या सहा दिवसानंतरही एक शिक्षक व एक शिक्षिका हजर न झाल्याने ठाणगाव ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी शिक्षक मिळण्यासाठी गटशिक्षण अधिकारी व त्या दोन्ही शिक्षकांविरोधात बाऱ्हे पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार लेखी अर्जाद्वारे केली आहे. (वार्ताहर)