आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यात मोबाइल कंपन्यांचे टॉवर बंद असल्यामुळे सेवा मिळत नसल्याची तक्रार करून सुरळीत सेवा देण्याची मागणी केली होती.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या दालनात त्यासंबंधी आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत
सहायक जिल्हाधिकारी, तहसीलदार, वनअधिकारी, मोबाइल कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कळवण तालुक्यातील २७ टॉवरपैकी ४ टॉवर पूर्ण बंद असून सुरगाणा तालुक्यातील ३७ टॉवरपैकी बंद असलेले १६ टॉवर तत्काळ सुरू करण्याची मागणी आमदार नितीन पवार यांनी केली. जिल्हाधिकारी मांढरे यांनी मोबाइल टॉवर कंपनीचे प्रतिनिधी यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सुरगाणा तालुक्यातील वनविभागाचा ना हरकत दाखला मिळण्यास अडचणी असल्यामुळे टॉवरचे काम रखडले आहे. त्यामुळे वनविभागाने त्यास परवानगी देण्याच्या सूचना आमदार नितीन पवार यांनी नाशिक पूर्वचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांना दिल्या.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विकास मीना, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, कळवण तहसीलदार बी.ए. कापसे, मोबाइल टॉवर कंपनीचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
फोटो - २८ कळवण मीटिंग
कळवण व सुरगाणा तालुक्यातील मोबाइल सेवेसंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या दालनात आयोजित बैठकी प्रसंगी आमदार नितीन पवार, सहायक जिल्हाधिकारी विकास मीना, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, तहसीलदार बी.ए. कापसे.
===Photopath===
280121\28nsk_44_28012021_13.jpg
===Caption===
कळवण व सुरगाणा तालुक्यातील मोबाईल सेवेसंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या दालनात आयोजित बैठकी प्रसंगी आमदार नितीन पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, उप वनसंरक्षक तुषार चव्हाण,तहसीलदार बी.ए. कापसे.