वणी : दिंडोरी पंचायत समितीत गेल्या अनेक महीन्यांपासुन अनियमीतता होत असल्याची तक्र ार विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली असुन याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
दिंडोरी पंचायत समितीतील अकरा ग्रामसेवक नियुक्त असलेल्या कार्यक्षेत्रा ऐवजी दुसऱ्या भागात कार्यरत असुन या संगीत खुर्चीच्या खेळामधे गटविकास अधिकारी यांची मुक संमती आहे किंवा कसे ? तसेच याबाबत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विद्यमान व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तत्कालीन व विद्यमान गटविकास अधिकारी यांच्याविरोधात या प्रकरणासंबधात नामोल्लेख करु न तक्र ार करण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
कार्यरत व नियुक्त ठिकाणी कामकाज करणे बंधनकारक आहे तसेच विविध ठिकाणी नियुक्ती बाबत नियम व कायदे यांची मार्गदर्शक चौकटीत प्रशासनाने काम करावे हा हेतु असतो दिलेल्या आदेशानुसार दिलेल्या मुख्यालयात काम करणे आवश्यक आहे परंतु ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक हे आदेशाची अंमलबजावणी न करता अनियमता करून संगीत खुर्चीच्या खेळात रमले आहेत
त्या मुख्यालयी हजर न होता तिसºयाच ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहेत. मात्र गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आदेशालाच हरताळ फासला गेल्याची भावना तक्र ारदार यांची झाल्याने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, सचिवालय कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी, सहसचिव ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय, मुख्य सचिव आदींकडे तक्र ार करण्यात आली आहे.