सुरगाणा : एकीकडे कळवण तालुक्याने प्रधानमंत्री घरकुल योजनेत चांगले काम करून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला असताना दुसरीकडे मात्र सुरगाण्यासारख्या अतिदुर्गम भागातील लाभार्थीच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत प्रशासन यंत्रणेतीलच काही व्यक्तींकडून घरकुल योजनेची बिले काढणेकरिता तसेच जिओ टॅग करणेकामी प्रत्येक लाभार्थीकडून रक्कम उकळली जात असल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत लेखी तक्र ार नागशेवडी ग्रामपंचायतमधील वांझुळपाडा येथील लाभार्थी शिवाजी तुकाराम पवार यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, प्रशासनाने याबाबत चौकशी समिती नियुक्त केली आहे.पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळाला असून, जिओ टॅग करण्यासाठी माझ्याकडून ग्रामपंचायतीमधील शिपाई प्रकाश चव्हाण यांनी एक हजार रुपये रोख घेतले आहेत. त्यानंतर रोजगार सेवक जयराम जोपळे यांनी पाच हजार रु पये घेतले. इतके पैसे देऊनही पुढील बिल काढणेकामी पाच हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप लाभार्थी पवार यांनी केला आहे, असे अनेक लाभार्थी आहेत की त्यांच्याकडून लुबाडणूक झाली आहे.याबाबत सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करून लाभार्थींची होणारी लूट थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायत सदस्य धर्मा पवार, भारती बागुल, मधुकर जोपळे, सुरेश गाढवे आदींच्याही स्वाक्षऱ्या आहेत.पैसे घेतल्याबाबत लाभार्थीनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्र ार केली असून, त्यांनी पाच जणांची चौकशी समिती नेमली आहे. येत्या दोन दिवसांत चौकशीअंती वस्तुस्थिती समजेल, त्यानंतर संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.- व्ही.डी. बागुल, ग्रामविकास अधिकारी, नागशेवडी
घरकुलासाठी पैसे घेतल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:28 AM
सुरगाणा : एकीकडे कळवण तालुक्याने प्रधानमंत्री घरकुल योजनेत चांगले काम करून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला असताना दुसरीकडे मात्र सुरगाण्यासारख्या अतिदुर्गम भागातील लाभार्थीच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत प्रशासन यंत्रणेतीलच काही व्यक्तींकडून घरकुल योजनेची बिले काढणेकरिता तसेच जिओ टॅग करणेकामी प्रत्येक लाभार्थीकडून रक्कम उकळली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
ठळक मुद्देसुरगाणा : प्रशासनाकडून चौकशी समिती नियुक्त