लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांकडून अडवणूक केली जात असल्याची तक्रार शेतकºयांकडून केली जात आहे. यामुळे शेतकºयांची आर्थिक लूट होत आहे.शेतकºयांचे कैवारी म्हणविणाºया बाजार समिती संचालकांनी तटस्थपणे या प्रकाराची पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शेतकरी आपला वेगवेगळा शेतमाल विक्रीसाठी आणत असतात. बाजार समितीतील काही व्यापाºयांकडून शेतकºयांची अडवणूक केली जात असल्याची शेतकºयांची तक्र ार आहे.विशेषत: भाजीपाला आणि फळांच्या बाबतीत याचे प्रमाणअधिक असल्याचे शेतकºयांचेम्हणणे आहे. एखाद्या शेतकºयाचा माल कितीही चांगला असला तरी साखळी करून व्यापारी अत्यंत कमी भावात माल विकण्यास शेतकºयाला भाग पाडतात कमी दरात खरेदी केलेला माल तास दोन तासांत दोन तीन रुपये अधिक दराने जागेवर विकतात असे प्रकार बाजार समितीमध्ये सर्रासपणे चालतात अशी तक्र ार नैताळे येथील शेतकरी शिवनाथ घायाळ यांनी केली. बाजार समिती संचालकांनी या प्रकाराची स्वत: पाहणी करून संबंधित व्यापाºयांवर कारवाई करावी व शेतकºयांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.मी पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीमध्ये द्राक्ष विक्र ीसाठी नेली होती. एका अडत्याने एक रु पया कमिशनवर माल विक्रीची बोली केली, मात्र त्यादिवशी माल विकलाच नाही. त्यांच्या सांगण्यावरून मी माल तेथेच मोजून ठेवला व दुसºया दिवशी अधिक दोन गाड्या माल घेऊन गेलो संबंधित अडत्याने सुरु वातीला जादा दराने मागणाºयांना माल दिला नाही आणि कमी दराने माल विक्र ी केला. नाईलाजास्तव मला त्यास सहमती द्यावी लागली. मी स्वत: टरबूज विकण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळीही व्यापाºयांनी साखळी केल्याचा अनुभव माझ्याबरोबरच इतरही शेतकºयांना आला. संचालकांनी याबाबत चौकशी करायला हवी व असे प्रकार होऊ नये याबाबत दक्षता घ्यावी.- शिवनाथ घायाळ, शेतकरी, नैताळे