एका महिलेची मालमत्ता अशाच प्रकारे बनावट आधार कार्ड बनवून खरेदी करण्यात आली. हे प्रकरण अंगलट येईल असे समजताच संबंधित अधिकाऱ्याने खरेदी थांबवून नंतर ती खरेदी नाकारली. मात्र या सर्व प्रक्रियेत संबंधित लोकांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ करण्यात आली. बनावट आधार कार्ड सादर करून फसवणूक करण्याऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी. आधारकार्ड कुठे बनवले, कुणी बनवले आणि हे करत असताना अजून किती आधार कार्ड अशा पद्धतीने किती प्रमाणात बनवण्यात आले याची सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास अधिकाऱ्यालादेखील अटक करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात यावा. जमीन व्यवहरात आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तींची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात त्वरित घेण्यात यावी व एक सहायता केंद्र उघडण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख सुदर्शन मराठे, संपर्कप्रमुख जितेंद्र वाघ, समनव्यक रमेश निकम, ललित मनोज आदींनी दिले आहे.
फोटो- २५ मालेगाव आधारकार्ड
बनावट आधार कार्डद्वारे जमीन खरेदी-विक्री करून फसवणूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख अनिल पाटील, सुदर्शन मराठे, जितेंद्र वाघ, रमेश निकम, ललित मनोज आदी.