नाशिक : ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांना शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यास महापालिका घेत असलेल्या आक्षेपाबाबत जिल्हा परिषदेने थेट पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार केली असून, यासंदर्भात अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी पत्र देत महापालिकेची सदरची कृती मानवतेच्या दृष्टीने खेदजनक असल्याचे म्हटले आहे.ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, त्यांच्यावर स्थानिक पातळीवर उपचाराची सुविधा जिल्हा परिषदेने केली असली तरी, ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष क्षीरसागर यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. त्याची दखल घेत पालकमंत्र्यांना दिलेल्या पत्रात क्षीरसागर यांनी, सामान्य रुग्णालयाची निर्मिती ग्रामीण भागातील जनतेसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी करण्यात आलेली असतानाही त्यांना उपचारार्थ दाखल करून घेतले जात नाही.