शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

शिवशाही बसेसबाबत तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 11:44 PM

राज्य परिवहन महामंडळात मागील महिन्यात दाखल झालेल्या शिवशाही बसेसच्या बाबतीत प्रवाशांनी अनेक तक्रारी केल्या असून, या तक्रारींची दखल राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने घेण्यात आली आहे. सदर बसेस सुरू केल्यानंतर प्रवाशांचे अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारींबाबत जेथे शिवशाही बसेस सुरू आहेत त्या एस.टी.च्या कार्यालयांना कळविण्यात आले असून, प्रवाशांच्या तक्रारी कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे समजते.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळात मागील महिन्यात दाखल झालेल्या शिवशाही बसेसच्या बाबतीत प्रवाशांनी अनेक तक्रारी केल्या असून, या तक्रारींची दखल राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने घेण्यात आली आहे. सदर बसेस सुरू केल्यानंतर प्रवाशांचे अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारींबाबत जेथे शिवशाही बसेस सुरू आहेत त्या एस.टी.च्या कार्यालयांना कळविण्यात आले असून, प्रवाशांच्या तक्रारी कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे समजते. तोट्यात चालेल्या महामंडळाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याबरोबरच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी शिवशाही बसेस आणण्यात आल्या. राज्यभरातील अनेक बसस्थानकांना शिवशाही बसेस पुरविण्यात आल्या. नाशिकला उशिराने का होईना १७ बसेस मिळाल्या. यातील काही बसेस या पुणेसाठी, तर काही बसेस कोल्हापूरसाठी सोडण्यात आल्या. पुण्याकडे निघालेली पहिली बस नाशिकरोडमध्येच पंक्चर झाल्याने पहिल्याच दिवशी प्रवासाला खो बसला. या बसने प्रवास करणाºयांना विलंबाने पुणे गाठावे लागल्याची चर्चा आहे. शिवशाही ही अत्यंत लक्झरी प्रकारातील बस असल्याने प्रवाशांना बसचे आकर्षण आहे. इतर बसेसपेक्षा कमी वेळात आणि आरामदायी प्रवास होणार असल्याने प्रवाशांनीदेखील या बसेसचे स्वागत केले होते. मात्र काही दिवसांतच या बसबाबत अनेक तक्रारी नोंदविण्यात आल्याने आरामदायी प्रवासाचा फेरविचार करण्याची नामुष्की महामंडळावर ओढावली.  शिवशाही बसेसमध्ये अनेक सुविधांबरोबरच तक्रार नोंदविण्याचीदेखील व्यवस्था आहे. या तक्रारबुकमध्ये सर्वच वयोगटांतील प्रवाशांनी आपले अभिप्राय नोंदविले आहे. यामध्ये बस आरामदायी असली तरी इंजिनचा आवाज मोठा असल्याची प्रमुख तक्रार नोंदविण्यात आली आहे. याबरोबरच वातानुकूलित व्यवस्था आणि स्पीडब्रेकरवरून बस गेल्याचे प्रकर्षाने जाणवत असल्याचे निरीक्षक प्रवाशांनी तक्रारवहीमध्ये नोंदविले आहे. या तक्रारींची वस्तुस्थिती जाणून घेण्याचे पत्र मुख्य कार्यालयाने विभागीय कार्यालयाला पाठविल्याचे वृत्त आहे. नाशिकमध्ये दाखल झालेल्या १७ बसेसपैकी चार बसेस या नागपूरला पळविण्यात आल्यामुळे महामंडळावर मोठी टीका झाली होती. आता नाशिकला १३ शिवशाही बसेस असून, येत्या काही दिवसांत पुन्हा नाशिकला बसेस मिळणार आहेत. आणखी बसेस दाखल होणार नाशिक एसटी महामंडळाच्या ताफ्यात १७ शिवशाही बसेस दाखल झाल्या होत्या. त्यापैकी चार बसेस नागपूरला देण्यात आल्या. आता आणखी बसेस मिळण्याची शक्यता आहे. शिवशाही ही वातानुकूलित ४७ आसनी बस असून त्यामध्ये लॅपटॉप, मोबाइल चार्जिंगची सोय आहे. तसेच एलइडी स्क्रीन, वायफाय अशा अत्याधुनिक सुविधा या बसमध्ये आहेत. राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये या बसेस सुरू झाल्या आहेत, तर एकूण १५०० शिवशाही बसेस या वर्षाअखेरपर्यंत राज्याच्या एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.