इगतपुरी : तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांची बैठक तहसील कार्यालय आवारात झाली. दुकानदारांच्या विविध समस्यांविषयी यात सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राधिकरण पत्र नूतनीकरण, रास्त भाव दुकानात वाढीव धान्याचा इष्टांक, मे महिन्यापासून मोफतचे धान्य वाटपाचे कमिशन मिळण्याबाबत, रास्त भाव दुकानात खराब धान्य पाठविण्यात येत असल्याच्या अडचणी दुकानदारांनी मांडल्या. या सर्व अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे डोळसे यांनी सांगितले. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील, जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी दुकानदारांच्या विविध समस्या समजून घेत मार्गदर्शन केले. त्रंबकेश्वर रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष सागर भगत, इगतपुरी तालुका अध्यक्ष शशी उबाळे, उपाध्यक्ष अरुण भागडे, सचिव संजय गोवर्धने, प्रकाश नाठे, देवराम मराडे यांनी दुकानदारांना मार्गदर्शन केले. नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची जिल्हा संघटनेच्या वतीने भेट घेण्यात आली. दुकानदारांचे प्रश्न सोडविण्यास मदत करावी अशी विनंती करण्यात आली. तहसीलदारांनी हे प्रश्न तत्काळ सोडविण्यात येतील, असे आश्वासन यावेळी दिले. दुकानदारांनी संघटनेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
140921\img-20210914-wa0001.jpg
इगतपुरी तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना दुकानदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील, व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे , त्रंबकेश्वर रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष सागर भगत, इगतपुरी तालुका अध्यक्ष शशी उबाळे, उपाध्यक्ष अरुण भागडे सचिव संजय गोवर्धने ,प्रकाश नाठे,