सायखेडा : गोदाकाठ भागातील विजेच्या समस्यांनी शेतकरी त्रस्त झाले असून, खरीप हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात आहेत. विजेच्या खोळंब्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याच्या तक्र ारींचा पाऊस रामनगर येथे वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि वायरमन यांच्या उपस्थितीत आमदार अनिल कदम यांनी घेतलेल्या बैठकीत पडला.कमी पर्जन्यमान झाल्याने थोडेफार पाणी विहिरींना आहे ते पिकांना देऊन खरीप हंगाम वाचविण्याचा शेतकरी प्रयत्न करत आहे, मात्र तासन्तास खंडित वीजपुरवठा, जळालेल्या डीपी, लोंबकळणाºया वीजवाहिन्या, निकामी डीपी आणि फ्यूज, लोडशेडिंग-व्यतिरिक्त पूर्वसूचना न देता खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक शेतकºयांनी लेखी तक्रार नोंदवली असूनही कार्यवाही होत नसल्याने कदम यांना शेतकरी सातत्याने दूरध्वनी करून विजेच्या तक्रारी करत असल्याने शेतकरी आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी, परिसरातील वायरमन यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी वीज वितरण कंपनीचे प्रभारी कार्यकारी अभियंता वट्टमवार, उपअभियंता पाटील, शाखा अभियंता कातकाडे यांसह शेतकरी उपस्थित होते.शेतकºयांनी वीजपुरवठ्याबाबत तक्र ारी केल्या. भीषण दुष्काळ स्थितीमुळे तालुक्यातील शेतकºयांचे अतोनात हाल होण्याची शक्यता आहे. थोड्याफार प्रमाणात खरीप हंगामातील पिके पदरात पाडून चार पैसे मिळण्याचे दिवस असल्याने विजेअभावी पिके करपत असतील तर सहन केले जाणार नाही. भारनियमनाव्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित करू नका, नादुरुस्त डीपी तत्काळ बदलून द्यावी, थकीत वीजबिलामुळे शेतकºयांना वेठीस धरून वीजपुरवठा खंडित करू नका, अशा सूचना अनिल कदम यांनी अधिकाºयांना दिल्या.