सटाणा : बागलाण तालुक्यातील तरसाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरु द्ध अविश्वास ठराव बुधवारी (दि.२७) मंजूर करण्यात करण्यात आला. मनमानी कारभारामुळे नऊ पैकी सात सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने दला पुना पिंपळसे यांना अखेर सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.शनिवारी दि.२३ मार्चला तरसाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वैशाली मोहन, सदस्य कमळा गांगुर्डे, सुमन पवार, मीना पवार, अंजना सोनवणे, लक्ष्मण पवार, त्र्यंबक गांगुर्डे या सात सदस्यांनी सरपंच दला पिंपळसे हे जनहिताच्या कामात अडथला निर्माण करतात, कामकाज करतांना सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी करतात म्हणून त्यांच्या विरु द्ध येथील तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला होता.त्यानुसार बुधवारी (दि.२७) तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी सदस्यांची तरसाळी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावली होती. चर्चेदरम्यान अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उंचावून मतदान घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने सातही सदस्यांनी मतदान केले. तर अविश्वास ठरावाच्या विरु द्ध सरपंच दला पिंपळसे, सदस्य दीपक मधुकर रौंदळ या दोघांनी मतदान केले. त्यानंतर तहसीलदार इंगळे यांनी अविश्वास ठराव सात मतांनी मंजूर झाल्याचे घोषित केले. त्यामुळे पिंपळसेंना सरपंच पदावरून पायउतार च्हावे लागले.दरम्यान रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी जोरदार व्यूहरचना सुरु झाली असून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या जागेसाठी अंजना सोनवणे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
तरसाळी सरपंच विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 7:12 PM
सटाणा : बागलाण तालुक्यातील तरसाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरु द्ध अविश्वास ठराव बुधवारी (दि.२७) मंजूर करण्यात करण्यात आला. मनमानी कारभारामुळे नऊ पैकी सात सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने दला पुना पिंपळसे यांना अखेर सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
ठळक मुद्दे अखेर सरपंचपदावरून पायउतार