देवळा : तालुक्यात गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला होता. चालू वर्षी तरी वरुणराजा वेळेवर बरसेल व हे वर्ष चांगले जाईल या अपेक्षेने शेतकरी खरीपपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून पावसाची प्रतीक्षा करीत आहे.यावर्षी पावसाचे आगमन थोडे उशिराने होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली आहे. असे असले तरी हिरमोड होऊ न देता उत्साहाने खरीपपूर्व मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.शेती करताना मजुरांच्या टंचाईमुळे शेतकºयांचा कल यांत्रिकीकरणानेकडे वाढू लागला आहे. बैलांच्या किमती सर्वसामान्य शेतकºयांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे अनेक शेतकºयांना बैलजोडी ठेवणे परवडत नाही. त्यातच प्रत्येक पिढीत होणारी वाटे -हिश्शामुळे शेतीचे तुकडे असून, अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकºयांची संख्या सातत्याने वाढत आहे. या शेतकºयांना बैलजोडी ठेवून त्यांची देखभाल करणे व्यावहारिकदृष्ट्या परवडत नाही. यामुळे शेतकºयांकडील पशुधनाची संख्या रोडावली आहे. यातून मार्ग काढत दोन शेजारी शेतकरी प्रत्येकी एक बैल ठेवतात व आळीपाळीने आपल्या शेतीची मशागतीची व पेरणीची कामे करून घेतात.फोटो - देवळा तालुक्यातील वाजगाव येथे ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची मशागत करताना शेतकरी. (फोटो ०९ देवळा)
देवळा तालुक्यात मशागतीची कामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 9:59 PM
देवळा : तालुक्यात गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला होता. चालू वर्षी तरी वरुणराजा वेळेवर बरसेल व हे वर्ष चांगले जाईल या अपेक्षेने शेतकरी खरीपपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
ठळक मुद्देशेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.