नाशिक : अकरावी आॅनलाइन प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार सोमवारी (दि.१६) प्रसिद्ध होणारी दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई नागपूरसह राज्यातील विविध भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया प्रभावित झाल्यानंतर अकरावीच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पसंख्यांकांसाठी राखीव जागांवर संबंधित महाविद्यालयांनी प्रवेश पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यास काहीकाळ लागणार असल्याने दुसरी गुणवत्ता यादी गुरु वारी (दि.१६) जाहीर होणार आहे.शिक्षण विभागाने अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत सर्व महाविद्यालयांनी त्यांचा कोटा (५० टक्के), इनहाउस (२० टक्के) आणि व्यवस्थापन कोट्यातील (५ टक्के) जागा भरण्यासाठी विशिष्ट मुदत दिली होती. या कालावधीत प्रवेशप्रक्रि या राबवून रिक्त जागा शिक्षण विभागाकडे प्रत्यार्पित (सरेंडर) करण्याची सूचनाही करण्यात आली होती.या जागा आॅनलाइन प्रवेशप्रक्रि येतून भरण्यात येत असताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने राखीव कोट्यातील सर्व जागा महाविद्यालयांना भरण्याची सक्ती केली असून, प्रत्यार्पित केलेल्या जागांवर आॅनलाइन प्रवेशप्रक्रि येंतर्गत कोणत्याही विद्यार्थ्यास प्रवेश देण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. तसेच केंद्रीय प्रवेशप्रक्रि येच्या नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्यास त्यांना कनिष्ठ महाविद्यालयातील अल्पसंख्याक कोट्यातील रिक्त जागांवर आॅनलाइन प्रवेश देण्याचे आदेशित केले आहे.तथापि, प्रवेशप्रक्रि या अर्ध्यावर पोहोचल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिल्यामुळे आता महाविद्यालयांची पुरती कोंडी होणार आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार असल्याने सोमवारी प्रसिद्ध होणारी गुणवत्ता यादी गुरु वारी सकाळी ११ वाजता जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.दरम्यान, पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश सुरू होताच पावसामुळे प्रवेशासाठी दोन दिवस मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आल्यानंतर सुधारित वेळापत्रकानुसार सोमवारपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होणार होती. परंतु ही प्रवेशप्र्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच सुधारित वेळापत्रकातही बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.शहरात चार अल्पसंख्याक महाविद्यालयेउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर अल्पसंख्याक महाविद्यालयांना त्यांच्या कोट्यातील प्रवेश स्वत: पूर्ण करावे लागतील. नाशिक शहरातील चाल अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ बॉइज टाउन कनिष्ठ महाविद्यालयाने अल्पसंख्याक कोट्यातील ४० जागा प्रत्यार्पित केल्या आहेत. या सर्व जागा आता शाळेकडे वर्ग करण्यात येणार आहेत. शहरातील बॉइज टाउनसह विस्डम आय, नॅशनल उर्दू महाविद्यालय आणि फ्रावशी अकॅडमी या चार महाविद्यालयांत एकूण सातशे विद्यार्थी प्रविष्ट होऊ शकतात. परंतु बॉइज टाउन व्यतिरिक्त अन्य महाविद्यालयांनी त्यांच्या कोट्यातील जागा प्रत्यार्पित केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवेशप्रक्रि येवर त्याचा फारसा प्रभाव पडणार नसल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
अकरावीचे राखीव प्रवेश पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:38 AM