नाशिक : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने बळीराजाची लगबग वाढली असून, शनिवार (दि. १६ जुलै)अखेर जिल्ह्णातील खरिपाच्या सहा लाख ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख ५९ हजार २२९ (२४ टक्के) हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत.भात पिकाचे खरिपाचे ६६ हजार ७०० हेक्टर लागवडीचे क्षेत्र असून, त्यापैकी तीन हजार ९४९ हेक्टर क्षेत्रावर भाताच्या रोपांची लागवड झाली आहे. तसेच खरीप बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ६४ हजार ५९२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे मका पिकाचे एक लाख ७३ हजार हेक्टर सरासरी लागवडीखालील क्षेत्र असून, १६ जुलैअखेर त्यापैकी ९७ हजार ३२६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. खरीप भूईमुगाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ३१ हजार ३०० हेक्टर असून, त्यापैकी दहा हजार २६ हेक्टर क्षेत्रांवर खरिपाच्या भूईमुगाची लागवड करण्यात आली आहे. खरीप सोयाबीनचे ५७ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असून, त्यापैकी ११ हजार ३३६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. जिल्ह्णात खरिपाचे एकूण सहा लाख ५२ हजार हेक्टर सरासरी लागवडीखालील क्षेत्र असून, त्यापैकी एक लाख ५९ हजार २२९ (२४ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
दीड लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण
By admin | Published: July 17, 2016 1:40 AM