जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. २१) कोरोना आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर लक्षात घेता टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात यावे. त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात चार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू झाले असून आठ प्रकल्पांच्या टेस्टिंगचे काम सुरू आहे. या ऑक्सिजन प्रकल्पांच्या टेस्टिंगच्या कामात ज्या जबाबदार यंत्रणेकडून दिरंगाई होत असेल त्या संबंधित यंत्रणेवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही भुजबळ यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सादरीकरण केले. बैठकीत मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, नियोजन अधिकारी किरण जोशी, पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. उत्कर्ष दुधेडिया, डॉ. संजय गांगुर्डे, डॉ. राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
चौकट===
अशी आहे तिसऱ्या लाटेची तयारी
कोरोना काळात कोरोना विषयक उपाययोजनांसाठी आतापर्यंत ५६ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तसेच जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या पूर्व तयारीसाठी साधारण एक हजार नवीन बेड्स वाढविण्यात आले आहेत. झाकीर हुसेन रुग्णालयात १०० किलोलिटरचे ऑक्सिजन टँक बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तीन महिने पुरेल इतका औषधसाठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. आठ ऑक्सिजन प्रकल्पांच्या टेस्टिंगचे काम सुरू आहे.