शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

निलंबित तहसीलदारांचे जबाब पूर्ण

By admin | Published: May 27, 2015 11:51 PM

सुरगाणा घोटाळा : गुरुवारी कागदपत्रांची तपासणी

नाशिक : सुरगाणा येथील शासकीय धान्य घोटाळा प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने निलंबित तहसीलदारांसह अन्य कर्मचाऱ्यांचे जाबजबाब नोंदवून घेण्याची कार्यवाही पूर्ण केली असून, ही चौकशी धान्य घोटाळ्यात प्रत्येकाची जबाबदारी व त्याने पार पाडलेले कर्तव्य इतपतच प्राथमिक पातळीवर मर्यादित ठेवण्यात आली. गुरुवारी मात्र यासंदर्भातील दप्तराची तपासणी केली जाणार आहे. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीच्या अन्य सदस्यांनीही नाशिकला हजेरी लावून अगोदर चौकशीची रूपरेषा ठरवून ज्यांच्यावर विधीमंडळ अधिवेशनात ठपका ठेवण्यात आला त्या सर्वांना नोटीस बजावून समितीसमोर हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकारी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, लेखा कर्मचारी व सातही तहसीलदार समितीसमोर हजर झाले होते. त्यात समितीने प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलावून ते करीत असलेले काम, त्यांची जबाबदारी व सुरगाणा धान्य घोटाळ्याशी त्यांचा असलेला संबंध तपासून पाहिला. काही मोजकेच प्रश्न विचारून या घोटाळ्यात संबंधित किती सहभागी आहेत, हे समितीने वैयक्तिकरीत्या तपासून पाहताना समितीसमोर हजर झालेल्यांकडून दिली गेलेली माहितीच त्यांचा जबाब म्हणून ग्राह्ण धरला. अशा प्रकारे चौकशी करताना दुसऱ्याकडे बोट दाखविण्यासही समिती सदस्यांनी नकार दिल्यामुळे प्रत्येकाने फक्त आपल्यापुरतीच माहिती समितीपुढे दिली. बुधवारी समितीचे सदस्य पुन्हा मुंबईकडे रवाना झाले असून, गुरुवारी जिल्हा पुरवठा खात्याने तालुक्यांशी केलेला पत्र व्यवहार, धान्याचे नियतन, वाहतूकदाराकडून झालेली वाहतूक, प्रत्येक तालुक्याला मिळालेला कोटा व गुदाम तपासणीचा अहवाल अशा बाबींची तपासणी केली जाणार आहे.