शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

शेतकरी संपाला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:30 AM

सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मजदूर महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या संपाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सायखेडा येथे आंदोलनादरम्यान तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर सिन्नर-शिर्डी महार्गावर तसेच सायखेड्यात शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.

नाशिक : सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मजदूर महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या संपाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सायखेडा येथे आंदोलनादरम्यान तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर सिन्नर-शिर्डी महार्गावर तसेच सायखेड्यात शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.  लासलगाव येथे लिलाव सुरळीत सुरू असले तरी संप असल्याने आवक घटली आहे. आतापर्यंत केवळ कांद्याचे आठ ट्रॅक्टर लिलावासाठी आले असून, सरासरी भाव ४०० ते ९५० पर्यंत होते. दिंडोरीतही शेतकरी संप नसला तरी शेतमालाची आवक कमी झाली आहे. पेठमधून मोठ्या प्रमाणात विक्रीस येणाºया आंब्याची आवक आज अत्यंत कमी झाली तर दररोजचा बाजारही सुरळीत सुरू होता. दिंडोरी बाजार समितीत केवळ तीन पिकअप व तीन ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली. वणी उपबाजारातही शेतकरी फिरकले नाहीत, त्यामुळे सर्वत्र शुकशुकाटच होता. पिंपळगाव बाजार समितीमध्ये केवळ पाच वाहने लिलावासाठी आली. देवळा तालुक्यातील खामखेडा येथील शेतकºयांनी रस्त्यावर टमाटे व कांदे फेकून सरकारचा निषेध व्यक्त करत शेतकरी संपाला पाठिंबा दिला.गोदाकाठ भागात कडकडीत संपसायखेडा : गोदाकाठ भागातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले असून, सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सायखेडा चौफुली येथे रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध व्यक्त केला. खबरदारी म्हणून सायखेडा पोलिसांनी तीन आंदोलन कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले आहे. परिसरातील प्रत्येक गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मागील वर्षी शेतकरी आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या गोदाकाठ भागातील ४२ गावांत यंदादेखील शेतकºयांनी कडकडीत बंद पाळला आहे. विशेष म्हणजे सर्व शेतकºयांनी संपात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला असून, एकही शेतकºयाने शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणला नाही. दूध उत्पादक शेतकºयांनी आपले दूध घरीच ठेवले मात्र दूध संकलन केंद्रात आणले नाही त्यामुळे परिसरातील सर्व गावातील दूध संकलन केंद्र बंद पडली होती.  शेतमालाला व दुधाला हमीभाव मिळावा, कर्जमाफीतील त्रुटी दूर करून उर्वरित शेतकºयांना कर्जमाफी मिळावी, वयोवृद्ध  शेतकºयांना पेन्शन योजना सुरू करावी, खते आणि औषधांच्या निर्धारित किमती कमी करून शेतीसाठी येणारा खर्च कमी करावा, शेतकºयांना मिळणाºया कर्जतील अटी व शर्ती कमी करून कर्ज योजना सुलभ करावी, अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी देशातील शेतकरी संपावर गेला आहे.  सायखेडा परिसरात गोदावरी नदीचे खोरे असल्याने उन्हाळ्यात मुबलक पाणी, काळी कसदार जमीन यामुळे उन्हाळ्यात नगदी पिके घेतली जातात, परिसरात भाजीपाला, गाजर, मिरची, पिकांचे उत्पादन जास्त प्रमाणात आहे. शेतमाल तोडणी करण्याचे काम सुुरू आहे. शेतकºयांना चार पैसे मिळण्याची वेळ असूनसुद्धा आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी शेतकºयांनी आपल्या उत्पादनावर पाणी सोडून स्वयंस्फूर्तीने  सहभाग घेतला आहे. शेतमाल शेतकºयांनी शेतातून काढला नाही त्यामुळे बाजार समितीत माल विक्र ीसाठी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रस्ते ओस पडले आहे तर बाजार समितीत शांतता पसरली आहे. खबरदारी म्हणून सायखेडा पोलिसांनी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरातील शेतकरी नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दिवसभर करडी नजर ठेवली होती.

टॅग्स :Farmerशेतकरी