नाशिक: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या महाराष्टÑ बंदला नाशकात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवायचे की नाही हा निर्णय पालकांवर सोडण्यात आल्याने काही पालकांनी मुलांना शाळेत न पाठविणे पसंत केले तरी काही पालकांनी मुलांना शाळेत सोडले. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची संख्या थोडी रोडावलेली दिसली. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार करु नये अशा शासनाच्या सुचना असल्याने त्या पार्श्वभूमीवर शहरातील कारभार सुरळीत सुरु असलेला दिसतो आहे. पहाटपासून शहर बससेवा नियमीतपणे धावत आहेत. दुकानेही सुरु असून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान मराठा क्रांती मोर्चाची दिशा ठरवण्यासाठी शहरातील एका लॉन्समध्ये सध्या बैठक सुरु असून सर्वानुमते आंदोलनाची रणनिती निश्चित करण्यात येणार आहे.
नाशकात मराठा मोर्चाला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:08 PM
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या महाराष्टÑ बंदला नाशकात संमिश्र प्रतिसाद
ठळक मुद्देमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या महाराष्टÑ बंदला नाशकात संमिश्र प्रतिसाद मिळाला