नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला नाशकात संमिश्र प्रतिसाद लाभत आहे. शहरात किरकोळ घटना वगळता व्यवहार सुरळीत सुरु आहे. बंद शंभर टक्के बंद असल्या तरी खाजगी वाहानांन प्रवाशांना इच्छित स्थळी ये-जा करता येत आहे. काही शाळा, दुकाने बंद असली तरी दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु आहेत. जागोजागी पोलीस चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. बसचे नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने रात्रीच सर्व बसेस डेपोत जमा करण्यात आल्या होत्या. पंचवटी परिसरातील काही शाळा लवकर सोडून देण्यात आल्या तर सकाळी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खाजगी टॅक्सी, बसचालक यांनी वाहतूक बंद ठेवली होती. नाशिकरोड येथे सकाळी दुकाने, आॅफिसेस बंद करण्याचे आवाहन देत कार्यकर्त्यांनी फेरी काढली. भगूर, देवळाली कॅम्प रस्ता, येथे टायर जाळत वातावरण निर्मीती करण्यात आली.दरम्यान गंगापूर धरण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. राम कदम, खा. चंद्रकांत खैरे यांच्या प्रतिमेस जलसमाधी देण्यात आली. सातपूर येथे बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. परिसरातील बहुतांशी शाळांना सुटी देण्यात आली होती. औद्योगीक वसाहतीतील कारखान्यांमध्ये उपस्थितीवर थोडा परिणाम जाणवला.
मराठा आंदोलनाला नाशकात संमिश्र प्रतिसाद, बस बंद, व्यवहार सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:54 AM
काही तुरळक घटना वगळता शहरात शांतता
ठळक मुद्देकाही तुरळक घटना वगळता शहरात शांतता