लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सातपूर परिसरात संमिश्र प्रतिसाद लाभला.पूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, बिनव्याजी पतपुरवठा करण्यात यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या यांसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडई, सातपूर कॉलनीतील मार्केट, अशोकनगर येथील भाजी मार्केट, श्रमिकनगर येथील भाजी मार्केट, गंगापूर गावातील भाजी मार्केट आदिंसह परिसरातील भाजी मार्केटमधील भाजीपाला विक्रे ते आणि व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून सहभाग घेतला आहे. एरवी गजबजणाऱ्या मार्केटमध्ये सोमवारी शांतता दिसून आली. यापूर्वी सातपूर गावातील शेतकऱ्यांनी भाजी मंडईत फलक लावून जनजागृती करत संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.भाजी मार्केट वगळता अन्य भागांतील व्यवहार सुरळीत चालू होते. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीवर या बंदचा काहीही परिणाम जाणवला नाही. कारखान्यातील कामगार नियमित कामावर हजर होते.
सातपूरमध्ये संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: June 06, 2017 3:22 AM