नाशिक : सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जेलरोड, रेल्वेस्थानक परिसर, वडाळानाका, मेनरोड, गंजमाळ आणि शालिमार परिसरात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. दुपारनंतर मात्र सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू झाले.वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाराष्टÑ बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार नाशिक शहर व जिल्ह्यातील दुकानदार व वेगवेगळ्या व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक शहर व जिल्हा शाखेने केले होते. शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास सकाळी अभिवादन करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. शहरात सकाळी संजय साबळे, दीपचंद दोंदे, प्रकाश पगारे, मुकुंद गांगुर्डे, वामनराव गायकवाड, दापक डोके, अविनाश शिंदे, बाळासाहेब गांगुर्डे, गौतम बागुल, उर्मिला गायकवाड, गौतम गायकवाड, विनोद दोंदे, खंडू वाघ, मनीष रोकडे आदी कार्यकर्त्यांनी परिसरात फेरी काढून व्यापाºयांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.नाशिकरोड परिसरातीलदेखील दुकाने बंद करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिसरातून फेरी काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून फेरी काढण्यात आली. परिसरातील व्यापाºयांनी बंदला प्रतिसाद दिला. दुपारनंतर मात्र दुकाने पूर्ववत सुरू झाली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:26 PM
सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जेलरोड, रेल्वेस्थानक परिसर, वडाळानाका, मेनरोड, गंजमाळ आणि शालिमार परिसरात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. दुपारनंतर मात्र सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू झाले.
ठळक मुद्देव्यवहार सुरळीत : नाशिकरोड परिसरात बंद; विक्रेत्यांचा सहभाग