चार वाॅर्डातून अकरा जागांपैकी एक जागा बिनविरोध झाल्याने १० जागांसाठी २२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
वाॅर्ड क्रमांक एकमध्ये दोन जागांसाठी दुरंगी लढत झाली. नागरिकांचा मागासप्रवर्ग जागेतून शिवराम विठ्ठल तांबे (२९२) यांनी संदीप दगु तांबे (१५१) यांचा १४१ मतांनी पराभव केला. महिला राखीव गटातून शोभा विनायक तांबे (३३८) यांनी मनीषा योगेश तांबे (१०३) यांच्यावर तब्बल २३५ मतांनी मात केली. वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये तीन जागांपैकी मनीषा भरत तांबे यांची सर्वसाधारण महिला गटातून बिनविरोध निवड झाली. सर्वसाधारण गटाच्या दोन जागांसाठी दुरंगी लढत झाली. अनिल दौलत तांबे (४५७) व रामहरी शंकर तांबे (४२६) हे विजयी होत त्यांनी संतोष केदारनाथ तांबे (१८४) यांचा पराभव केला. वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये तीन जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. सर्वसाधारण पुरुष जागेसाठी तिरंगी लढत होत अपक्ष उमेदवार दत्तात्रय बबन सोनवणे (२२०) यांनी रामदास मारुती जायभावे (१६३) व शरद लक्ष्मण तांबे (१०३) यांचा पराभव केला. सर्वसाधारण महिला गटातून दोन जागांवर पंचरंगी लढत होत दीपाली सुरेश सोनवणे (२७८) व लता नंदीराम वाघ (२४२) यांनी विजय मिळवत उषा सोनवणे (२११), अंजली विलास जायभावे (१५४) व रुपाली गोविंद पालवे (२३) यांना पराभवाचे धनी व्हावे लागले. वाॅर्ड क्रमांक चारमध्ये अनुसूचित जाती गटातून चेतन केशव रणशेवरे (२२७) यांनी पिंटू जगन साळवे (१६९) व भाऊसाहेब रणशेवरे (२६) यांचा पराभव केला. महिला राखीव गटातून वैशाली रामदास जायभावे (२२६)व कीर्ती लहानू सोनवणे (२८७) यांनी रुपाली पालवे (१९३) व प्रीती रणशेवरे (१३०) यांचा पराभव केला. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
===Photopath===
240121\24nsk_14_24012021_13.jpg
===Caption===
गोंदे ग्रामपंचायत निवडणूकीत विजय मिळवल्यानंतर जल्लोष करताना बाजार समितीचे माजी सभापती विनायक तांबे, सुरेश सोनवणे, भरत तांबे आदीसह विजयी उमेदवार व कार्यकर्ते.