शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

सर्वसमावेशक आणि आश्वासक पंढरीची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:50 AM

महाराष्टÑ आणि राज्यालगतच्या कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र, गुजरात व भारतातील अन्य भागांतूनही हजारो-लाखो वारकरी स्री-पुरुष पंढरीच्या या वारीत सामील होत असतात. आषाढी वारीच्या कुतूहल आणि उत्सुकतेपोटी जगभरातील अन्य देशांतूनही अनेक लोक येत असतात. कुणाच्याही आमंत्रण आणि आग्रहाशिवाय लाखो वारकरी स्री-पुरुष आबालवृद्ध का येतात हा कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. विठुरायाच्या दर्शन- भेटीसाठी लाखो वारकरी या आषाढी वारीत सामील होत असतात. हा एक चमत्कार आहे.

ठळक मुद्देखरा खुरा निखळ, सात्त्विक आनंद वारीत सामील झाल्यावर

प्रा. डॉ. यशवंतराव पाटील

महाराष्टÑ आणि राज्यालगतच्या कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र, गुजरात व भारतातील अन्य भागांतूनही हजारो-लाखो वारकरी स्री-पुरुष पंढरीच्या या वारीत सामील होत असतात. आषाढी वारीच्या कुतूहल आणि उत्सुकतेपोटी जगभरातील अन्य देशांतूनही अनेक लोक येत असतात. कुणाच्याही आमंत्रण आणि आग्रहाशिवाय लाखो वारकरी स्री-पुरुष आबालवृद्ध का येतात हा कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. विठुरायाच्या दर्शन- भेटीसाठी लाखो वारकरी या आषाढी वारीत सामील होत असतात. हा एक चमत्कार आहे.या वारीला खूप मोठी पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे. महाराष्टÑात अशी अनेक घराणी, कुटुंबे, परिवार व व्यक्ती आहेत की ज्यांना ‘पंढरीच्या आषाढी वारीचे’ एक-दोन महिने अगोदरच वेध लागलेले असतात. वेगवेगळ्या संत-महंतांच्या सत्पुरुषांच्या लहान-मोठ्या हजारो दिंड्या त्यांच्या स्री-पुरुष वारकऱ्यांसमवेत सामील होतात. या सामीलकीचा आगळावेगळा भक्तिभाव त्यांच्या चेहºयावर दिसत असतो.‘दिंड्या चालल्या-चालल्या, विठ्ठलाच्या दर्शनाला।।घुमे गजर हरिनामाचा, भक्त हरिनामात रंगला ।।टिळा वैष्णव हे ल्याले । गळा हार तुळशीमाळ ।।एक तारी देते साथ । टाळ-मृदंगाच्या ताला ।।’ असे दिसून येते.आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र अशा चार वाºया वर्षभर सुरू असतात. मात्र आषाढी वारी ही सर्वांत मोठी असते. सर्वच स्तरातून या वारीची विशेष दखल घेतली जाते. लाखो वैष्णवांची मांदियाळी विठ्ठल भावभक्तीने मजल दरमजल करीत पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल दर्शन-भेटीच्या ओढीने पुढे सरकत असते. वारीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. ‘सम-सकला पाहू’ आणि ‘भेदा भेद भ्रम अमंगळ’ हे वारीतल्या सर्व वारकऱ्यांचे आचार विचार सूत्र असते. हेच फार कौतुकाचे आहे. वारीत सामील न होणाºयांनाही कौतुक करायला व अचंबित होण्यास लावणारे आहे. सर्व जाती-धर्म, पंथ-गोत्रांचे वैष्णव विठ्ठलभक्तीने अभिमंत्रित होऊन विठ्ठलनामाचा गजर करीत असतात. यातूनच त्यांच्यातील काम, क्रोध, राग, लोभ, मोह, माया यांसारख्या षड्रिपूंचा निचरा होत असतो. यातून वारकºयांना आंतरिक शुद्धता आणि समाधान लाभते. पंढरीच्या आषाढी वारीबद्दल बरंच काही वाचण्यात, ऐकण्यात पाहण्यात येते. या संबंधात वर्तमानपत्रातही वारीसंबंधी लेखनाचा महापूर दिसतो. दूरदर्शनवर बरीच दृश्ये दिसतात; पण खरा खुरा निखळ, सात्त्विक आनंद वारीत सामील झाल्यावर किमान वारीसमवेत काही अंतर पायी चालण्यातून मिळत असतो. ‘एक मेका सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ।।’ हा मनोभाव मनात साठवून प्रत्येक वारकºयाचा आचार-विचार, धर्म वारीत लहान-सहान प्रसंगातून पहायला मिळतो. सामील झालेल्यांना प्रत्यक्ष अनुभवास येतो. विठ्ठलाच्या भावभक्तीतून निर्माण झालेल्या शारीरिक, मानसिक आणि आत्मिक बळावरच वारीतील वारकरी पाऊस, वादळ, वारा, अडचणीचे अडवळणाचे घाट, अरुंद, गैरसोयीचे रस्ते... आदी कशाचीही पर्वा न करता आनंदविभोर अवस्थेत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे कूच करीत असतात. जसजसे पंढरपूर जवळ येते, तसतसे वारकºयांच्या हालचाली अधिकाधिक गतिमान आणि उत्साही होत जातात. मुखी विठुरायाचा गजर, काहींच्या हातात भगवे झेंडे, गळ्यात टाळ-मृदंग, कपाळी अष्टगंध व बुक्का... सारेच विलोभनीय! भक्तिभावाची श्रीमंतीदर्शविणारे असते. कुणी बेभान होऊन नाचत, कुणी फुगड्या घालत, कुणी टाळ-मृदंगाच्या तालात आणि सुरात भजन म्हणतात. प्रचंड गर्दीत सहभागी झालेल्या लाखो साधकांना लाडक्या विठुरायाचे दर्शन होईल का नाही, हा प्रश्न वारीत सामील न झालेल्यांचा असतो. ज्या विठुरायाच्या भावभक्तीने आणि त्याच्या दर्शनाच्या ओढीने अभिमंत्रित झालेल्यांना हा प्रश्नच पडत नाही. जसजसे पंढरपूर वारकºयांचे माहेर सुखाचा स्वर्ग जवळ जवळ येतो, तसतसा त्यांच्या मनात भाव निर्माण होतो.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)