नाशिक : जीएसटीतील अन्यायकारक तरतुदी विरोधात कॅटने पुकारलेल्या शुक्रवारच्या एक दिवसीय व्यापार व वाहतूक बंदला नाशकातील व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठेत सकाळच्या सत्रात सराफा व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळत सराफ बाजारात निदर्शेने केली. तर कापड व घाऊ धान्य व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. वाहतूकदारांनी शुक्रवारी गाड्यांचे लोडींग बंद ठेवले मात्र रस्त्यावरील वाहने सुरूच असल्याने भारतीय व्यापारी महासंघाने पुकारलेल्या बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आहे.
केंद्र सरकारने देशात २०१७ मध्ये जीएसटी करप्रणाली लागू केली. मात्र या कर प्रमाणालीत अनेक त्रूटी असून त्यामुळे व्यापारी त्रस्त असून अधिकाऱ्यांच्या जाचालाही व्यापारी कंटाळल्याचा नमूद करीत भारतीय व्यापारी महासंघाने जीएसटीतील त्रूटी , ई वे बील प्रणालीतील त्रूटी व इंधन दरवाढीविरोधात देशव्यापी संपाची हाक दिली होती. या संपाला नाशिकमधील विविध व्यापारी संघटना व नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशननेसह महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनेही पाठिंबा जाहीर केला होता. परंतु, प्रत्यक्षात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद न ठेवता काळ्याफिती लावून काम करीत जीएसटी, ई वे बील आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला. वाहतूक व्यावसायिकांनी वाहनांमध्ये माल भरण्याचे थांबविल्याने मालवाहतूक काही प्रमाणात ठप्प झाली. मात्र रस्त्यावर असेलेली वाहने नियमित सुरू होती. सराफ व्यावसािकांनी सकाळ सत्रात दुकाने बंद ठेवत काळ्या फितील लावून सराफ बाजार निदर्शने केली. तर घाऊक धान्य किराणा व्यावसायिकांनी काळ्या फिती काम केले. इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोज, देवळाली , पंचवटी, गंगापूरोज, सातपूर ,सिड़को पाथर्डी फाटा यासरख्या उपनगरांमध्येही बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला.
इन्फो :-
भारत व्यापार बंदमध्ये नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना, नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटना, नवीन नाशिक (सिडको) धान्य व्यापारी संघटना, नाशिकरोड देवळाली मर्चंट्स असोसिएशन, गंगामाई व्यापारी संघटना सातपूर, किराणा व्यापारी संघटना जेलरोड, किराणा व्यापारी संघटना, नाशिक मोटर मर्चंट असोसिएशन, भगूर मर्चंट्स असोसिएशन, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, दि सराफ असोसिएशन, ऑल इंडिया जेम्स अँण्ड ज्वेलरी आदींसह विविध व्यापारी संघटनांनी सहभाह नोंदवक काळ्या फिती लावून काम केले.
===Photopath===
260221\26nsk_61_26022021_13.jpg
===Caption===
जीएसटी, ई- वे बील आणि इंधनदरवाढीविरोधातील संपात सहभागी नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे. समवेत मेहूल थोरात, किशोर वडनरे, चेतन राजापूरकर. सुनील महालकर, योगेश दांडगव्हळ, पियुष इंदोरकर ,राजेश नागरे, कन्हैया आडगावकर आदी