मानोरी : महाराष्ट्र राज्य आय.टी. महामंडळात समाविष्ट करण्याच्या मुख्य तसेच इतर प्रलंबित मागण्या राज्य शासनाने तात्काळ पूर्ण करण्यासाठी संगणक परिचालकांचा १९ आॅगस्टपासून सुरू झालेला बेमुदत काम बंद आंदोलन १५ दिवसानंतर ही म्हणजेच २ सप्टेंबरला कायम सुरू असून अद्याप ही शासन संगणक मागण्या पूर्ण करण्यासाठी उदासीन असून या मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना नाशिक यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठीचे निवेदन ही भुसे याना देण्यात आले.या भेटी दरम्यान मागील आठ महिन्यांपूर्वी आझाद मैदानात झालेल्या आंदोलनात दादा भुसे यांनी सरकारच्या वतीने मध्यस्ती करत आश्वासन देत संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत संप स्थगित केला होता. यावेळी संगणक परिचालकांचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन भुसे यांनी दिले होते. आठ महिने उलटूनही अद्याप शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसून संगणक परिचालकांच्या हातावर तुरा देत केवळ आश्वासनावर मनधरणी करण्याचा प्रयत्न शासनाने केला असल्याची संतप्त भावना यावेळी संगणक परिचालकांनी व्यक्त केली. या भेटीत भुसे यांनी संगणक परिचालकांना पुन्हा आश्वासन देत बुधवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्याचा विषय मांडनार असून त्यात मार्ग काढणार असल्याचे सांगितले. भेटी दरम्यान जिल्हा कमिटी , तालुका कमिटी हजर होती.
संगणक परिचालकांचा १५ दिवसांपासून संप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 4:21 PM