मानोरी : सुमारे एक महिन्यापासून (१९ आॅगस्ट) महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मधील संगणक परीचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट करण्याची प्रक्रि या ९ सप्टेंबरपासून सुरू केली आहे.मंत्रालयात संगणक परिचालक राज्य संघटनेबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असता या चर्चेत महाराष्ट्र आय.टी. महंडळाकडून संगणक परीचालकांना नियुक्ती देण्यासाठी सध्या प्रगतीत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाचे काम सी.एस.सी-एस.पी.व्ही कडून आय.टी. महामंडळाकडे समाविष्ट करण्याची प्रक्रि या सुरू झालेली असून संबंधित प्रक्रि या आचारसंहिता लागू होण्याआधी पूर्ण करावी आणि संबंधित महाराष्ट्रातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट केल्याचा नवीन अध्यादेश शासनाने प्रसिद्ध केल्या शिवाय कोणत्याही प्रकारचे सुरू करणार नसल्याचे संगणक परीचालकांनी सांगितले आहे.चौकट....मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास सुरु वात केली असून ११ सप्टेंबरला संगणक परीचालकांना आय.टी. महामंडळात समाविष्ट करण्यासाठी आय.टी. विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प केंद्र शासनाची कंपनी सी.एस.सी-एस.पी.व्ही बघत आहे.हा प्रकल्प चालवण्याआधी ग्रामविकास विभाग, आय.टी. विभाग व सी. एस. सी-एस. पी. व्ही यांच्या मध्ये त्रिपक्षीय करार झालेला आहे. या कारारामधील सी.एस. सी-एस. पी. व्ही ऐवजी महामंडळाकडे हा प्रकल्प हस्तांतरित करायचा असल्याने त्यासाठीच्या प्रक्रि या सुरू झाल्या आहेत.आॅनलाईन कामासाठी दबाव तंत्राचे षडयंत्रसंगणक परीचालकांचा संप सुरू होऊन एक महिना झाला असून हे काम पुन्हा सुरू करण्यासाठी संगणक पतीचालकावर दबाव आणला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील आठ ते नऊ वर्षांपासून राज्यातील २७ हजार संगणक परिचालक आपल्या प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी लढा उभारत आहे. सध्या सुरू असलेल्या संप अंतिम असून यात प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याशिवाय काम सुरू करणार नसून काम करण्यासाठी दबाव टाकून काम करून घेत असेल तर संगणक परीचालकावर अन्याय होत असल्याच्या प्रतिक्रि या उपस्थित झाल्या आहेत.
संगणक परीचालकांना आय.टी. मंडळात समाविष्ट करण्यासाठी हालचाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 6:00 PM
मानोरी : सुमारे एक महिन्यापासून (१९ आॅगस्ट) महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मधील संगणक परीचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट करण्याची प्रक्रि या ९ सप्टेंबरपासून सुरू केली आहे
ठळक मुद्देनवीन अध्यादेश निघे पर्यंत संप सुरूच राहणार ; दबाव आणण्याची शक्यता